हिंदू अधिवेशनाला साहाय्य करणार्‍या सनातनच्या हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार !

(उजवीकडे) श्री. सुनील शेणवी भांडारी यांचा सत्कार करतांना पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे
(उजवीकडे) सौ. रेश्मा शेट तळावलीकर यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
(उजवीकडे) श्री. प्रदीप खोत यांचा सत्कार करतांना पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे
(उजवीकडे) श्री. संजय प्रियोळकर यांचा सत्कार करतांना पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. श्री. प्रदीप खोत, श्री रामनाथ देवस्थान समितीचे प्रतिनिधी

श्री रामनाथ देवस्थान समिती गेल्या सहा वर्षांपासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी निवास व्यवस्था, सभागृह आणि इतर सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षीही देवस्थान समितीने अधिवेशनासाठी चार सभागृह, भोजनगृह, ४७ खोल्या यांसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. यानिमित्त देवस्थान समितीचे सदस्य श्री. प्रदीप खोत यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केला.

२. श्री. सुनील शेणवी भांडारी, श्रीगौडपादाचार्य मठ, कवळे यांचे प्रतिनिधी

कवळे येथील श्रीगौडपादाचार्य मठ गेल्या सहा वर्षांपासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देत आहे. या वर्षी मठ समितीने अधिवेशनासाठी आठ खोल्या उपलब्ध करून दिल्या. यांचा सत्कार पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केला.

३. श्री. संजय प्रियोळकर, श्री नागेश देवस्थान समितीचे प्रतिनिधी

श्री नागेश देवस्थान समिती यांनी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली. या देवस्थान समितीचे श्री. संजय प्रियोळकर यांचा सत्कार पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केला.

४. श्री. श्रीकांत शेट वेरेकर

श्री. श्रीकांत शेट वेरेकर यांनी भोजनगृहासाठी लागणारे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्यांचा सत्कार पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केला.

५. सौ. रेश्मा शेट तळावलीकर, व्यवस्थापक, गोवा डेअरी

गोवा डेअरी आस्थापन हे अधिवेशनासाठी नियमित साहाय्य करते. या वर्षीही डेअरीने साहाय्य केले आहे. या डेअरीच्या व्यवस्थापक सौ. रेश्मा शेट तळावलीकर यांचा सत्कार सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी सौ. रेश्मा शेट तळावलीकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, मी माझे गुरु आणि ईश्‍वर यांना नमस्कार करते. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या या महान कार्यात आम्हाला संधी दिल्याविषयी गुरूंप्रति कृतज्ञ आहे. सर्व साधकांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. तुमच्या कार्यात हा आमचा छोटासा वाटा आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात