हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधनारूपी ब्राह्मतेज आवश्यक ! – पू. नंदकुमार जाधव

पू. नंदकुमार जाधव

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ब्राह्मतेजाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करतांना पू. नंदकुमार जाधव म्हणाले की, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये ब्राह्मतेज अर्थात् व्यक्तीगत आणि समष्टी साधनेचे महत्त्व आहे. केवळ शारीरिक पातळीवर प्रयत्न करून नव्हे, तर साधनेद्वारे आत्मबळ प्राप्त करून कार्य करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुलदेवी श्री भवानीदेवीचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे मनुष्यबळ आणि साधनसामग्री अल्प असूनही ते ५ बलाढ्य पातशाह्यांना नमवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्‍वराचे पाठबळ मिळण्यासाठी तसेच प्रभावी हिंदूसंघटन होण्यासाठी सर्वांनी साधना करून ईश्‍वराचे भक्त बनायला हवे.