हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्राविषयीची ज्योत प्रज्वलित करून त्यांच्यात शौर्यजागरण करणारी कल्याण येथील हिंदू ऐक्य दिंडी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदू एकता दिंडी

सामाजिक कार्य म्हणजे समाजातील रज-तमाचे आवरण काढून त्यातील चैतन्य उघड करणे

प.पू. पांडे महाराज

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ अंतर्गत सामाजिक चळवळ राबवणे म्हणजे समाजातील रज-तमाचे आवरण काढून त्यातील चैतन्य उघड करणे होय. नियमांवर आलेले काळे आवरण काढून शासनाला नियमाप्रमाणे कृती करायला लावणे आणि सत्यावर आलेले आवरण काढणे म्हणजे सामाजिक कार्य करणे होय.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०१७)

दिंडीत सहभागी धर्माभिमानी

कल्याण : अनेक विदेशी आक्रमकांची वक्रदृष्टी असतांना सर्वांना पुरून उरणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांनी पावन झालेले कल्याण शहर अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध ठिकाणी हिंदू एकता दिंडींचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्राची ज्योत प्रज्वलित करून त्यांना चैतन्याच्या दिशेने प्रवास करायला लावणारी, तसेच शौर्यजागरण करणारी हिंदू एकता दिंडी शहरात काढण्यात आली. हिंदु राष्ट्र हा एकच ध्यास मनात ठेवून शहरातील हिंदू संघटित झाल्याचा हाही ऐतिहासिक क्षण ! या दिंडीत ४०० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ती पाहून ‘प्रत्येक राज्यांत अशी दिंडी निघायला हवी’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया हिंदूंनी व्यक्त केली.

सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक दिंडीत सहभागी झाल्यामुळे
पोटशूळ उठलेल्या पोलिसांना बाणेदारपणे उत्तर देणारे साधक !

दिंडीला कायदेशीर अनुमती असूनही आदल्या दिवशी मध्यरात्री १२.४५ वाजता गोपनीय विभागातील अधिकार्‍याने सनातनच्या साधकाकडे संपर्क करून दिंडीविषयी माहिती घेतली. अधिकार्‍याने सांगितले, ‘‘अभय वर्तक पुष्कळ परखड बोलतात. तुम्ही त्यांना का बोलावता आणि प्रबोधन करायला लावता ? तसे केल्यास आम्ही तुमच्यावर गुन्हा प्रविष्ट करू.’’ (ओवैसीबंधूंना त्यांच्या प्रक्षोभक विधानांविषयी विचारण्याचे धैर्य गोपनीय विभाग करेल का ? – संपादक) त्या वेळी साधकाने, ‘‘जर ओवैसी त्यांची मते मांडू शकतात, तर अभय वर्तक का नाही ?’’ असा प्रतिप्रश्‍न केल्यावर अधिकारी गप्प बसले. (हिंदु धर्माविषयी अभिमान जागृत असल्यानेच सनातनचे साधक असे परखडपणे बोलू शकतात ! – संपादक) त्यानंतर त्यांनी साधकाला धमकावले, ‘‘तुला उचलायची वेळ येऊ देऊ नकोस.’’ तेव्हा साधकाने त्यांना बाणेदारपणे, ‘‘साहेब आताच पोलीस ठाण्यात येऊ का ? तुम्हाला काय कारवाई करायची ती एकदाच करा.’’

गोपनीय विभाग, सीआयडी आणि आयबी यांच्या साध्या वेशातील पोलिसांनी दिंडीचे चित्रीकरण केले. (अन्य धर्मियांच्या कार्यक्रमाचे असे चित्रीकरण केले जाते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

चैतन्यमय दिंडीला उत्साहात आरंभ !

हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांच्या हस्ते दिंडीच्या आरंभी ध्वजपूजन करण्यात आले. तद्नंतर शंखनादाने दिंडीला आरंभ झाला.

सायंकाळी ५ वाजता कल्याण (पश्‍चिम) येथील साई चौकातून दिंडीला प्रारंभ होऊन ती गोल्डन पार्क, बेतुरकरपाडा, भगवा तलाव, सहजानंद चौक, शिवाजी महाराज चौक ते शंकरराव चौक येथे संपली. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन दिंडीची सांगता करण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंमध्ये जागृती
होणे आवश्यक ! – नरेंद्र पवार, भाजप आमदार, कल्याण

नरेंद्र पवार

आपण हिंदुस्थानात राहून आपल्याला हिंदु राष्ट्र्र म्हणून मान्यता मिळत नाही. त्यासाठी जागृती करावी लागणे, हे आपले दुर्दैव आहे. हिंदु राष्ट्रासाठी काढण्यात आलेल्या या दिंडीला आणि हिंदु राष्ट्र जागृती अभियानाला माझा पूर्ण पाठिंबा असून मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. कल्याणमधील एक हिंदु म्हणून मी या दिंडीत सहभागी झालो आहे.

अमृत असलेल्या विचारांचे पुनर्जीवन करणे म्हणजेच हिंदु
राष्ट्राची स्थापना ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

दुर्गेश परुळकर

आम्हाला आता पुन्हा पारतंत्र्यात जायचे नाही. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कोणतीही तडजोड नाही. ‘कोणासमोरही नांगी टाकणार नाही’, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येकाने अंगीकारायला हवा. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या जो आड येईल, तो देशद्रोही असेल. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत म्हणजे जे विचार मृत होत नाहीत, ते अमृत. अशा विचारांचे पुनर्जीवन करणे म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी कृतीशील व्हा !

हिंदु राष्ट्र होणे ही काळाची आवश्यकता !
– मोरेश्‍वर भोईर, उपमहापौर, कल्याण-डोंबिवली महापालिका

 

हिंदुस्थानातच हिंदु धर्मियांवर अन्याय झाल्याच्या घटना घडतात. हिंदु धर्मियांविषयी अन्याय झाल्याची एखादी घटना घडल्यास ती गांभीर्याने घेतली जात नाही; मात्र इतर धर्मियांच्या संदर्भात एखादी घटना घडल्यास तिचे धार्मिक सूत्र केले जाते. ही स्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय असून ती काळाची आवश्यकता झाली आहे.

हिंदु राष्ट्र्रासाठी देशात विविध ठिकाणी दिंड्यांचे आयोजन हवे ! – प्रमोद जोशी, हिंदु महासभा

मोरेश्‍वर भोईर

आतंकवाद, लव्ह जिहाद, बलात्कार या समस्या थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीप्रमाणे देशात विविध ठिकाणी दिंडी काढायला हवी. त्याच्याच जोडीला हिंदु राष्ट्राचा विचार लोकांच्या मनात जागृत करायला हवा.

रणरागिणी शाखेच्या प्रशिक्षणवर्गात
सहभागी होऊन सक्षम बना ! – सौ. सुनिता पाटील, रणरागिणी

आजच्या महिला पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत आहेत. झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती या विरांगनांच्या शौर्याचा महिलांना विसर पडत आहे. त्यातच छेडछाड, बलात्कार, अत्याचार या घटनाही वाढत आहेत. त्याला प्रतिकार करण्यासाठी महिलांनी रणरागिणी शाखेच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊन, तसेच धर्मशिक्षण घेऊन महिलांवर होणार्‍या आघातांना प्रतिकार करण्यासाठी सिद्ध व्हावे.

सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून दिंडीचा मोठा प्रसार !

सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून कल्याण येथील हिंदू एकता दिंडीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दिंडीचे चलचित्र जवळजवळ १ लाख २५ सहस्र २३६ लोकांनी पाहिले, तर दिंडीतील धर्मध्वजाच्या पूजनाचे चलचित्र ४७ सहस्र २३४ लोकांपर्यंत पोेचले. श्री. अभय वर्तक यांचे भाषण ४० मिनिटांत ३३ सहस्र लोकांनी पाहिले. तसेच अन्य मान्यवरांच्या भाषणांच्या चलचित्रांना चांगला प्रतिसाद मिळाला.

उपस्थित मान्यवर

भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार, भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, हिंदु महासभेचे श्री. प्रमोद जोशी, भाजपच्या गावकल्याण समितीच्या सभापती आणि महिला अन् बालकल्याण समितीच्या सौ. वैशाली अर्जुन पाटील, भाजपच्या कल्याण शहर सरचिटणीस सौ. भावना मनराजा आणि सौ. मंदा देशमुख, भाजपच्या जिल्हा अध्यक्षा सौ. प्रिया शर्मा, कीर्तनकार-प्रवचनकार, तसेच योग शिक्षिका सौ. शिवानी नेमावरकर

सहभागी संघटना

राष्ट्रीय वारकरी सेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शंभूराजे प्रतिष्ठान, श्री योग वेदांत सेवा समिती, दुर्गवीर प्रतिष्ठान, हिंदु राष्ट्र सेना, हिंदु शक्ती वाहिनी, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, समाधी बाबा मित्र मंडळ, भाजप वाहतूक संघटना, रणरागिणी शाखा, हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, खंडेलवाल सेवा समिती कल्याण आणि वैद्य जीम या संघटना, तसेच शिवसेना, भाजप आणि मनसे आदी राजकीय पक्ष

वेचक वेधक

१. हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी यांनी लाठीकाठीचे प्रत्यक्षिक दाखवले.

२. उगले भजनी मंडळाच्या वतीने सप्तश्रृंगी माता मंदिराच्या समोर ध्वजपूजन झाले. विशेष म्हणजे याच मंदिरापासून कल्याणमधील हिंदु राष्ट्र्र जागृती अभियानातील विविध उपक्रमांना प्रारंभ झाला.

३. शहरातील विविध राजकीय पक्ष आणि आस्थापने यांनी दिंडीच्या मार्गावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेले आणि त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार दर्शवणारे फलक लावले होते. त्यांद्वारेही वातावरणनिर्मिती झाली.

४. शिवकालीन युद्धकौशल्याची प्रात्याक्षिके हे फेरीचे विशेष आकर्षण ठरले.

१०० कोटी हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र्राची ज्योत पेटल्यास
हिंदु राष्ट्र लवकर येईल ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

अभय वर्तक

आज पाकिस्तान मुसलमान राष्ट्र, तर इस्रायल हे ज्यूंचे राष्ट्र म्हटले जाते; मात्र १०० कोटी हिंदू असलेले हिंदुस्थान हे निधर्मी राष्ट्र म्हणवले जाते, हे आमचे दुर्देव आहे. इसिस ही जिहादी आतंकवादी संघटना भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी निधर्मी नव्हे, तर देशाला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. १०० कोटी हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र्राची ज्योत पेटली, तर हिंदु राष्ट्र यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी परमेश्‍वराकडे प्रतिदिन प्रार्थना करायला हवी !

कल्याणमध्ये हिंदूंचे संघटन आवश्यक ! – कैलास जाधव, हिंदु राष्ट्र सेना

हिंदूंना संघटित करण्यासाठी अशा प्रकारच्या ऐक्य दिंडीचे अयोजन ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. ऐतिहासिक कल्याण शहराची ओळख इसिसच्या धर्मांधांमुळे पालटत आहे. त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर कल्याणमध्ये हिंदूंचे संघटन आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात