सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले

‘ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हिंदु महासभा, हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आदी संघटनांची राष्ट्र आणि प्रांत स्तरीय अधिवेशने व्हायची तशीच अधिवेशने हिंदु जनजागृती समितीद्वारे होत आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, याची ग्वाही हिंदु जनजागृती समितीद्वारा आयोजित केलेल्या अधिवेशनातून मिळते. १४.६.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या समीप असणार्‍या रामनाथ देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा शुभारंभ झाला.

१. शंखनाद

सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. शंखनादातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींचा वातावरणातील त्रासदायक लहरींवर तीव्र आघात झाल्यामुळे वातावरणात कार्यरत असणार्‍या अनिष्ट शक्ती अनेक कि.मी. अंतर दूर ढकलल्या गेल्या. शंखनादातून प्रक्षेपित होणार्‍या भावपूर्ण नादलहरींनी वायूमंडलात कार्यरत असणार्‍या दैवी शक्तींना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून कृपाशीर्वाद देण्यासाठी साद घातली गेली.

२. श्रीकृष्णाला प्रार्थना

उपस्थित सर्वांनी हिंदु धर्म राज्याचे संस्थापक भगवान श्रीकृष्ण यांना आम्हाला बुद्धी, शक्ती आणि भक्ती देण्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा कार्यक्रमस्थळी श्रीकृष्णाची धर्मशक्ती आशीर्वादाच्या रूपाने कार्यरत झाली.

३. दीपप्रज्वलन

संतांमधील क्षात्रतेजाने दीपरूपी धर्मतेज प्रज्वलित झाल्यामुळे भूमंडलात कार्यरत असणारी निर्गुण स्तरावरील धर्मशक्ती तेजाच्या रूपाने धर्मस्थळी कार्यरत झाली. त्यामुळे उपस्थित धर्माभिमान्यांना हिंदु धर्माचे रक्षण, प्रसार आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्‍वराची शक्ती मिळाली.

४. वेदमंत्रपठण

वेदमूर्ती केतन रविकांत शहाणे, वेदमूर्ती आेंकार पाध्ये आणि वेदमूर्ती सिद्धेश करंदीकर यांनी ‘अग्नीमीळे पुरोहितं आणि शांतीमंत्र’ या वेदमंत्रांचे पठण केले. या मंत्रांच्या उच्चारातून संपूर्ण वातावरणात ब्राह्मतेजाने युक्त असणारी नादशक्ती कार्यक्रमस्थळी कार्यरत होऊन तिच्यामधून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी युक्त असणार्‍या नादलहरींचे प्रक्षेपण संपूर्ण ब्रह्मांडात चालू झाले. वेदमंत्रातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यदायी नादलहरींमुळे कार्यक्रमाचे स्थळ आणि उपस्थित असणार्‍या व्यक्ती यांची शुद्धी झाली. ब्रह्मवृंदांचा सत्कार, म्हणजे वेदोनारायणाचाच सत्कार झाला आणि वेदोनारायणाचे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला कृपाशीर्वाद लाभले.

५. व्यासपिठावर उपस्थित असणार्‍या संतांचा सन्मान

व्यासपिठावर उपस्थित असणार्‍या संतांचा सन्मान करण्यात आल्यावर धर्मकार्य करणार्‍या ईश्‍वराच्या सगुण रूपांचा सन्मान झाल्यामुळे ईश्‍वराच्या सगुण शक्तीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृपाशीर्वाद दिले.

६. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश वाचून दाखवणे

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश उत्तरप्रदेश राज्याचे हिंदूसंघटक समन्वयक श्री. नीलेश सिंगबाळ यांनी वाचून दाखवला. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार त्यांच्या संदेशातून व्यक्त होत होते. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कृपाशीर्वाद उपस्थितांना मिळाले. या संदेशाचे वाचन चालू असतांना वातावरणात अवतारी शक्ती आणि अवतारी चैतन्य यांचे प्रक्षेपण होऊन हिंदू अधिवेशनाच्या कार्यस्थळाभोवती ईश्‍वरी तत्त्वाचे संरक्षककवच निर्माण झाले.

७. प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचा संदेश वाचून दाखवणे

पुणे येथील संत प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचा संदेश झारखंड राज्याचे हिंदु समन्वयक श्री. प्रदीप खेमका यांनी वाचून दाखवला. संदेशाच्या रूपाने विश्‍वदर्शनदेवता आणि प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचे साधक अन् धर्माभिमानी यांना शुभाशीर्वाद लाभले. तेव्हा वातावरणात चैतन्यदायी शीतल लहरींचे प्रक्षेपण होतांना जाणवले.

८. हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन करणे

८ अ. पू. चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन करणे

हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर पू. चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. ‘पू. पिंगळेकाका यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णच त्याचे तेजस्वी विचार अर्जुनाप्रमाणे प्रयत्नरत असणार्‍या धर्माभिमानी हिंदूंपर्यंत पोहोचवत आहे’, असे जाणवले. पू. पिंगळेकाकांच्या वाणीमधून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचे एकत्रिकरण होऊन त्यांची एकत्रित शक्ती वातावरणात प्रक्षेपित झाली. त्या चैतन्यलहरींचा श्रोत्यांच्या चित्ताला स्पर्श होऊन त्यांच्या मनात धर्मबीज रोवले गेल्याने त्यांच्यातील धर्मप्रेम जागृत झाले.

पू. पिंगळेकाका यांनी विषय मांडून उपस्थितांना धर्मप्रबोधन करून त्यांना धर्मकार्यासाठी उद्युक्त केले, तेव्हा ‘श्रीकृष्णाची मारक शक्ती पू. पिंगळेकाकांच्या माध्यमातून कार्यरत झाली आहे’, असे जाणवले. त्यांच्या वाणीतील तेज:पुंज विचार ऐकल्यानंतर मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन उपस्थित धर्माभिमानी आध्यात्मिक स्तरावर धर्मकार्य करण्यासाठी उद्युक्त होतात, असे जाणवले.

८ आ. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय
प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन करणे

श्री. रमेश शिंदे यांच्यामध्ये हिंदु धर्माचे रक्षण आणि प्रसार करण्याची आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे त्यांच्या वाणीतून श्रीकृष्णाच्या धर्मशक्तीच्या इच्छा आणि क्रिया या शक्तीच्या संयुक्त लहरी वातावरणात प्रक्षेपित होऊन उपस्थित धर्माभिमान्यांना कार्यप्रवण करण्यासाठी उद्युक्त केले जाते.

८ इ. यति मां चेतनानंद सरस्वती यांनी मार्गदर्शन करणे

त्यांच्या माध्यमातून धर्माची मारक शक्ती आणि ईश्‍वराची सात्त्विकता कार्यरत असून धर्मरक्षणाचे कार्य करण्यासाठी त्या हिंदुत्वनिष्ठांना कृतीप्रवण करतात.

८ ई. श्री. अभय वर्तक यांनी मार्गदर्शन करणे

यांच्या चैतन्यमय वाणीतून ब्राह्मतेजाचे किरण आणि क्षात्रतेजाच्या ठिणग्या वेगाने बाहेर पडत होत्या. त्यांच्या ओजस्वी वाणीतून मिळणार्‍या स्फुल्लिगांतून धर्मरक्षणाचे कार्य करणाची सर्वांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचीच वाणी कार्यरत असल्याचे जाणवले.

८ उ. प.पू. साध्वी सरस्वती

प.पू. साध्वी सरस्वती यांच्यावर सरस्वतीदेवीचा वरदहस्त असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या वाणीतून सरस्वतीची विणा झंकारावी तसे तेजस्वी, ओजस्वी धर्मप्रबोधक विचारांचे प्रक्षेपण त्यांच्या ओघवत्या वाणीतून होऊन श्रोत्यांमध्ये सुप्त अवस्थेत असणारी वीरश्री जागृत झाली.

८ ऊ. पू. नंदकुमार जाधव

पू. नंदकुमार जाधव यांनी केलेल्या मार्गदर्शनातून चैतन्य आणि ईश्‍वराची तारक-मारक शक्ती यांच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाले.

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यक्त संकल्पामुळे अनिष्ट शक्तींचा
डाव उधळला जाणे आणि गोव्यात सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ होणे

हे अधिवेशन होऊ नये, यासाठी मोठ्या अनिष्ट शक्तींनी नियोजन केले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या परावाणीतून साकारलेल्या संकल्पशक्तीपुढे अनिष्ट शक्तींचे बळ निष्फळ ठरले आणि गोव्यात सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ झाला, असे मला जाणवले.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०१७)

 सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात