सनातनच्या ग्रंथांत दिलेल्या सूत्रांनुसार प्रबोधन केल्यामुळे सोनपूर परिसरातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यात १०० टक्के यशस्वी ! – नितीन सोनपल्ली, मध्यप्रदेश


आमची संघटना स्थापन केली, तेव्हा मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आमच्या कार्यात अनेक अडथळे आणले. पोलीस आणि प्रशासनाच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे प्रतिवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी काढण्यात येणार्‍या कान्हायात्रेचीही अनुमती रहित करण्यात आली. अशा वेळी कार्य कसे करावे ? अधिवक्त्यांचे मार्गदर्शन घेऊन अनुमती कशी मिळवावी, यांविषयी हिंदु जनजागृती समितीकडून आम्हाला मार्गदर्शन मिळाले. सनातनच्या ग्रंथांमुळे सोनपूर परिसरात होणारे हिंदूंचे धर्मांतर १०० टक्के रोखण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हे अधिवेशनाला आल्यामुळे शक्य झाले. ग्रंथ वाचून तेथील युवकांना धर्मांतराचे षड्यंत्र देशभरात चालू आहे, ते लक्षात आले.