(म्हणे) ‘बंदी घातलेली सनातन संस्था हिंदू अधिवेशनाचा भाग !’

हिंदुद्रोही पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे हास्यास्पद ट्वीट !

सनातन संस्थेवर कोणत्याही सरकारने बंदी घातलेली नसतांना अशा प्रकारचे हास्यास्पद ट्वीट करून स्वतःला आंतरराष्ट्रीय पत्रकार समजणार्‍या राजदीप सरदेसाई यांनी ‘हिंदुद्वेषामुळे ते कसे भरकटत जात आहेत’, हे दाखवून दिले आहे !

मुंबई : गोव्यातील रामनाथी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला हिंदुद्रोह्यांकडून विरोध केला जात आहे. यात पत्रकार राजदीप सरदेसाई यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनी या अधिवेशनाचा उल्लेख करत ‘बंदी घालण्यात आलेली सनातन संस्था या अधिवेशनाचा भाग आहे’, असे म्हटले आहे. (सनातन संस्थेवर बंदी नसतांना ‘बंदी घालण्यात आलेली संस्था’ असा उल्लेख करणारे पाकप्रेमी आणि मुसलमानप्रेमी राजदीप सरदेसाई यांनी कधी जिहादी आतंकवादी संघटना, काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारा माकप आदींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सरदेसाई लिहितात, ‘हिंदु राष्ट्रासाठी गोव्यात अधिवेशन होत आहे. ते म्हणतात, ‘प्रथम धर्म आणि मग राज्यघटना’ (भारतीय राज्यघटना वर्ष १९५० मध्ये लिहिण्यात आली आणि त्यात आतापर्यंत १०० हून अधिक सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि पुढेही होणार आहेत. सनातन वैदिक हिंदु धर्म सहस्रावधी वर्षांपासून या पृथ्वीतलावर आहे. तर मग प्रथम धर्म आणि नंतर राज्यघटना असे कोणी म्हणत असल्यास ते चुकीचे कसे ? ‘इस्लाम प्रथम आणि नंतर देश’ असे म्हणणार्‍यांच्या आणि कृतीतून दाखवणार्‍यांच्या विरोधात राजदीप सरदेसाई यांनी कधी ट्वीट केले आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशी विचारसरणी असलेल्या या अधिवेशनाचा ‘बंदी घालण्यात आलेली सनातन संस्था’ भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणारा कोणी आहे का ?’ (देशात कायदा आणि सुव्यवस्था नाही, हे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था सांगतच आहे. ती असती, तर काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवाद निर्माणच झाला नसता आणि त्यांचे समर्थन करणारे कारागृहाबाहेर राहिले नसते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात