हिंदुत्वनिष्ठ संघटनांनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करा ! – पू. नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

पू. नंदकुमार जाधव

आज अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना वेगवेगळ्या राज्यांत कार्य करत आहेत. यांपैकी बहुतांश संघटनांचे कार्य गोहत्या रोखणे, धर्मांतराला विरोध करणे, अन्य धर्मियांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना विरोध करणे, संस्कृतीरक्षण अशा स्वरूपांचे म्हणजे धर्मरक्षणाचेच आहे. या सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन कार्य करू लागल्या, तर धर्मरक्षणाच्या कार्याला राष्ट्रीय स्वरूप येईल. एखाद्या हिंदू संघटनेचे कार्य एखाद्या राज्यापुरते मर्यादित असले, तरी तिच्या आंदोलनाला देशभरातील हिंदू संघटनांचे पाठबळ मिळेल, म्हणजे स्थानिक स्तरावरील आंदोलनांचे राष्ट्रीयीकरण होईल. हिंदूंचे व्यापक संघटन व्हावे, यासाठी हिंदु संघटनांनी एकमेकांचे साहाय्य, अनुभवांची देवाणघेवाण, परस्परपूरक कार्य इत्यादी कृतींची जोड दिली, तर हे संघटन सहज साध्य होऊ शकेल ! याशिवाय हिंदु संघटनांनी विवध विचारवंत, अधिवक्ता, सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे जागृती करणारे यांचेही संघटन करणे आवश्यक आहे.