सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी देवतांच्या चरणी प्रार्थना !

फोंडा (गोवा) : ‘रामनाथी, फोंडा, गोवा येथे १४ जून ते १७ जून २०१७ या कालावधीत होत असलेले सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडू दे, हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊ देत आणि अधिवेशनाला अपेक्षित यश लाभू  दे’, अशी प्रार्थना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ जून या दिवशी रामनाथी येथील श्री रामनाथदेव, कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी आणि बांदोडा येथील श्री महालक्ष्मीदेवी यांच्या चरणी करण्यात आली. या वेळी देवतांच्या चरणी श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी बंगाल येथील निखिल बंग नागरिक संघ या संघटनेचे सचिव श्री. सुभाष चक्रवर्ती, मुंबई येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विवेक भावे, सनातन संस्थेचे गोव्यातील साधक श्री. संगम बोरकर आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात