हिंदु संतांची अपकीर्ती करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांशी लढण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी हा !

केदारनाथ येथील महाप्रलयात काही जण वाहून गेले, काहींना मृत्यू आला, तर काही जण मृत्यूशी लढत होते. अशा वेळी तेथे ४५ ते ५० हिंदुद्वेष्ट्यांची टोळी साधूंच्या वेशात आली. त्यांनी हिंदु संतांची अपकीर्ती केली आणि स्त्रियांवर बलात्कार केले. त्यांच्याजवळील पैसे आणि दागिने लुटले. अन्य भाविकांना लुटले. अधिकोषातील रोकड पळवली. भाविकांची झालेली ही लूटमार पुढे येणार्‍या तीव्र आपत्काळाच्या वेळी घडणार्‍या प्रसंगांची सूचना असल्याने अशा हिंदुद्वेष्ट्यांविरुद्ध लढण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी व्हा !

– श्री. मधुसूदन कुलकर्णी (७.७.२०१३)

हिंदूंनी सामर्थ्यवान बनणे अपरिहार्य !

१. सक्षमतेने प्रतिकार करण्यात हिंदू उणे पडणे

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे आमचे ध्येय आहे. ही स्थापना करण्यासाठी आम्ही हिंदूंचे संघटन करत आहोत; पण संघटनासह हिंदूंना सामर्थ्यवान बनवण्याचीही पुष्कळ आवश्यकता आहे. अनेक प्रसंगांत आपण पाहिले असेल की, हिंदू प्रतिकार करतात; पण त्यामध्ये काहीतरी उणीव रहाते. ही उणीव दूर करण्यासाठी आणि प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. आपण प्रशिक्षण केवळ स्वतःसाठी घेत नसून त्याद्वारे भारत आणि हिंदु धर्मियांच्या रक्षणासाठीही प्रयत्न करणार आहोत.

२. विजय मिळवण्यासाठी साधना का करायला हवी ?

२ अ. साधनेमुळे शरीर आणि मन यांद्वारे लढता येणे

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षण करणारे सर्व जण आध्यात्मिकदृष्ट्या साधना करणारे हवेत. प्रशिक्षणवर्गांतून साधनेविषयी माहिती दिली जाईल; कारण साधनेेनेच आपण शरीर आणि मन यांद्वारे कोणाशीही लढू शकतो. यासाठी साधना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला केवळ लढायचे नाही, तर विजय मिळवायचा आहे आणि जेथे धर्म असतो, साधना असते, तेथे विजय मिळतो.

२ आ. साधना केल्यासच ईश्‍वर अनुकूल होतो !

आतापर्यंत आपण इतकी वर्षे प्रयत्न करत आहोत; पण त्यात साधना हा भाग न्यून पडतो. हिंदु धर्मानुसार आपण साधना केली, तर दैव, म्हणजे ईश्‍वर आपल्याला अनुकूल होईल.

– एक कार्यकर्ता, हिंदु जनजागृती समिती.

एकट्याने व्यायाम करण्यापेक्षा
स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात जाऊन व्यायामप्रकार करा !

बरेच साधक प्रतिदिन व्यक्तीगत स्तरावर व्यायामप्रकार करतात. त्यातून शारीरिक स्तरावर लाभ होतो. यापेक्षा स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात अनेक साधक एकत्र येऊन व्यायाम करत असल्याने त्यांना शारीरिक स्तरावर लाभ होण्यासह त्यांच्यात सांघिकभाव निर्माण होण्यास साहाय्य होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि हिंदूसंघटनाचे कार्य करण्यासाठी साधकांमध्ये सांघिकभाव निर्माण होणे आवश्यक आहे. साधकांनी एकत्रित येऊन प्रशिक्षणवर्गात व्यायाम करणे, हाही वीरश्री जागृत करणारा एकप्रकारचा सत्संग असल्याने त्याचा आध्यात्मिक लाभही होतो.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात