हिंदूंनो, धर्माचरण आणि साधना करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पात्र व्हा !

धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कळल्यानंतरच खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र अन् धर्म यांचे खरे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्‍यांनी धर्महानी केल्यास ती त्यास विरोध करते; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य धर्माचरण आणि साधना करणारी व्यक्तीच करू शकते. यावरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य धर्माचरणी आणि साधना करणारे हिंदूच का करू शकतात, हे लक्षात येईल. अशा हिंदूंमध्येच खर्‍या अर्थाने शक्तीसामर्थ्य निर्माण होऊ शकते.

राष्ट्र आणि धर्म हानी रोखण्यासाठी हिंदु शक्तीचे योगदान हवे !

१. हिंदूंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेगिंग्स सामाजिक संकेतस्थळावरून काढले !

२. महाराष्ट्रात राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी अल्पसंख्यांकांच्या ‘ना हरकती’ची अट शासनाकडून रहित करण्यात आली.

३. हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे ‘अॅमेझॉन’ ने ॐ चे चिन्ह असलेल्या चपलांची विक्री थांबवली !

४. कुर्ला येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्यां मिरवणुकीला पोलिसांनी नाकारलेली अनुमती केवळ हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे मिळाली.

५. नेरूळ (नवी मुंबई) येथील संत तुकाराम महाराज और इस्लाम हा वादग्रस्त परिसंवाद हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर रहित केला.

६. हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांची परिणती पिंपरी (पुणे) येथील कुल जमाअती तंजीम आयोजित निषेध सभेत असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित रहाण्यात झाली.

७. जळगाव येथे लावलेले चित्रपटाचे अश्लील होर्डिंग धर्माभिमान्यांनी पाठपुरावा करून काढून टाकण्यास भाग पाडले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात