भावनांचा विस्फोट होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची घोषणा करा !

॥ समर्थभक्तांचा संदेश ॥

पू. सुनीलजी चिंचोलकर

‘जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हाच हिंदु राष्ट्राची घोषणा व्हायला हवी होती; पण केवळ ‘मुसलमानांचे तुष्टीकरण करायचे’, या एकमेव धोरणामुळे तेव्हापासून असंख्य हिंदूंची मानसिक घुसमट केली जात आहे. वस्तूतः गांधीजींनी या देशाचा उल्लेख नेहमी ‘हिंदुस्थान’ असाच केला आहे. मग या देशाचे नामकरण ‘हिंदुस्थान’ असे करण्यात काय अडचण आहे ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली ९० वर्षे ही धडपड चालवली आहे. आता सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या मागणीला अधिक व्यापक स्वरूप दिले आहे. हे अधिवेशन, म्हणजे त्या दिशेने हिंदूंनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

‘हिंदु राष्ट्र म्हणजे काहीतरी मुसलमानविरोधी कारवाई’, हा अपसमज पसरवण्यात काँग्रेसवाले, साम्यवादी आणि पुरोगामी यशस्वी झाले आहेत; पण हिंदु राष्ट्रात मुसलमान अन् ख्रिस्ती यांचाही अंतर्भाव राहील. केवळ त्यांना या देशाशी अप्रामाणिकपणा करता येणार नाही. हिंदु राष्ट्राशी अप्रामाणिकपणा करणारे हिंदूही हिंदु राष्ट्रात टिकू शकणार नाहीत. हिंदु राष्ट्र ही भौगोलिक संकल्पना नसून भावनात्मक संकल्पना आहे. सरकारने अधिक काळ हिंदूंच्या भावनेशी खेळ खेळू नये आणि हिंदूंच्या भावनांचा विस्फोट होण्यापूर्वीच हिंदु राष्ट्राची घोषणा करावी. या अधिवेशनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा !’

– समर्थभक्त पू. सुनीलजी चिंचोलकर, पुणे (८.६.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात