हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणार्‍या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी प्रसिद्धीमाध्यमांत विशेष उत्सुकता !

देशभरातील विविध वृत्तपत्रांसह वृत्तवाहिन्यांवरून व्यापक प्रसिद्धी !

रामनाथी (गोवा) : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथे १४ जून ते १७ जून या कालावधीत होत असलेल्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी जनतेसमवेत प्रसिद्धीमाध्यमांतही विशेष उत्सुकता दिसून येत आहे. (हिंदु राष्ट्राविषयी जागृती करणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वृत्तांना व्यापक प्रसिद्धी देणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आभार मानले आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या अधिवेशनासाठी स्थानिक, राज्यस्तरीय, तसेच अनेक राष्ट्रीय प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींनी स्वत:हून आयोजकांना संपर्क करून या अधिवेशनात होणार्‍या सत्रांना उपस्थित राहून वृत्तसंकलन करण्यात विशेष रस दाखवला आहे.

नवभारत या हिंदी भाषिक दैनिकाने दिलेली प्रसिद्धी

या अधिवेशनाच्या संदर्भात देशभरात विविध राज्यांत झालेल्या पत्रकार परिषदांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

जन्मभूमी या गुजराती भाषेतील वृत्तपत्राने दिलेली प्रसिद्धी

महाराष्ट्रातील लहान-मोठ्या अशा सर्वच वृत्तपत्रांसह गोवा, कर्नाटक, गुजरात, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतील प्रसिद्धीमाध्यमांनी हिंदू अधिवेशनाच्या वृत्तांना ठळक प्रसिद्धी दिली आहे. विशेष म्हणजे प्रसिद्धीमाध्यमांसमवेत टाइम्स नाऊ, न्यूज २४, सुदर्शन न्यूज अशा राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांनीही हिंदू अधिवेशनाची विशेष दखल घेतली आहे. देशभरातील वृत्तवाहिन्या अधिवेशनाच्या संदर्भात चर्चासत्रेही आयोजित करून हिंदु राष्ट्राविषयी जागृती करत आहेत.

मुंबईतील नव राष्ट्र या वृत्तपत्राने दिलेली प्रसिद्धी
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात