१.१२.२०१७ ते ३१.१२.२०१८ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादि उपाय

१. विविध चक्रांवर देवतांची चित्रे लावणे

‘देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे साधकांनी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार जप शोधल्यानंतर संबंधित देवतेचे चित्र उपायांसाठी न वापरता खाली दिल्याप्रमाणे श्रीकृष्णाची चित्रेच वापरावीत.

टीप – आवश्यकतेनुसार योग्य ते जप करावेत; मात्र चित्रे वरीलप्रमाणेच लावावीत.

टीप १ – ‘पुढे’ म्हणजे शरिराचा पुढचा भाग (चक्राशी संबंधित भाग)

टीप २ – ‘पाठी’ म्हणजे शरिराचा पाठचा भाग (चक्राशी संबंधित भाग)

२. जिज्ञासू, ५ – ६ वर्षांहून अल्प काळ व्यष्टी साधना
करणारे किंवा २ – ३ वर्षांहून अल्प काळ समष्टी
साधना करणारे यांनी करावयाचे नामजप, मुद्रा अन् न्यास

व्यष्टी साधना : वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न

समष्टी साधना : समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न

२ अ. वाईट शक्तींचा त्रास असलेल्यांनी करायचे
नामजपादी उपाय

२ अ १. वाईट शक्ती म्हणजे काय ?

वाईट शक्ती म्हणजे त्रासदायक सूक्ष्म-देह (लिंगदेह).

२ अ २. वाईट शक्तींच्या त्रासांची काही लक्षणे

अ. शारीरिक लक्षणे : औषधोपचार आणि पथ्यपाणी कित्येक मास (महिने) किंवा वर्षे करूनही विकार बरे न होणे

आ. मानसिक लक्षणे : कारण नसतांना एखाद्याचा राग येणे, चिडचिड होणे, मनात अकारण नकारात्मक वा निराशेचे विचार येऊन मन अस्वस्थ होणे, अती भित्रेपणा इत्यादी.

इ. अन्य लक्षणे : कारण नसतांना डोके जड होणे, गळा दाबल्यासारखे वाटणे, छातीवर दाब जाणवणे, एखाद्या दिशेकडे पाहून घाबरणे, वाईट स्वप्ने पडणे, सात्त्विक व्यक्तीच्या सान्निध्यात रहातांना त्रास होणे, एखादे स्तोत्र म्हणतांना जांभया येणे, साधना करावीशी न वाटणे इत्यादी. यांपैकी एक किंवा अनेक त्रास होत असल्यास आपल्याला वाईट शक्तींचा त्रास होत आहे, असे समजावे. आपल्याला वाईट शक्तींमुळे एखादा त्रास होत आहे का ?, हे लक्षात येत नसल्यास चांगली साधना असणार्‍या आणि सूक्ष्मातील जाणू शकणार्‍या साधकाला किंवा संतांना याविषयी विचारावे. वाईट शक्तींचा त्रास होत असल्यास त्या त्रासावर पुढे दिल्याप्रमाणे उपाय करावेत.

२ अ ३. प्रतिदिन करायचे नामजप, मुद्रा आणि न्यास
२ अ ३ अ. नामजपासह मुद्रा आणि न्यास करण्याचे महत्त्व :

नामजपासह मुद्रा आणि न्यास केल्यास उपायांचा लाभ अधिक मिळतो. (मुद्रा आणि न्यास यांविषयीचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (२ खंड) यात केले आहे.)

२ अ ३ आ. त्रासनिवारणासाठी सनातनच्या विकार-निर्मूलनासाठी नामजप-उपाय या ग्रंथातील उपयुक्त असलेले नामजपादी उपाय निवडून ते करणे : सनातनच्या विकार-निर्मूलनासाठी नामजप-उपाय (३ खंड) या ग्रंथात नामजपाचे विविध प्रकार आणि त्यांमागील शास्त्र सांगितले आहे. विविध नामजपांपैकी ज्या नामजपाने स्वतःला अधिक लाभ होईल, असा नामजप कसा निवडावा, हे त्या ग्रंथातून समजून घ्यावे. नामजपाशी संबंधित मुद्रा आणि न्यास यांविषयीही त्या ग्रंथातून समजून घ्यावे.

२ अ ३ इ. काही कारणामुळे वरील सूत्र २ अ ३ आ यानुसार सनातनच्या विकार-निर्मूलनासाठी नामजप-उपाय या ग्रंथातील नामजपादी उपाय निवडणे शक्य नसेल किंवा स्वतःला असलेल्या त्रासावर उपयुक्त नामजप त्या ग्रंथात दिलेला नसेल, तर काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा नामजप आणि मुद्रा अन् न्यास करणे

२ अ ३ इ १. काळानुसार आवश्यक असलेल्या श्रीकृष्णाच्या नामजपाचे महत्त्व : त्या त्या काळानुसार त्या त्या देवतेचे तत्त्व ब्रह्मांडातून इतर देवतांच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असते. यानुसार सध्या भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहे. यामुळे श्रीकृष्णाचा नामजप हा सर्वसाधारणपणे विविध त्रासांवर उपयुक्त ठरतो. पृथ्वीवरील सध्याची रज-तमात्मक अराजकसदृश परिस्थिती पालटून सात्त्विक असे धर्मराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करण्याची आवश्यकता बनली आहे. या दृष्टीनेही धर्मसंस्थापक श्रीकृष्णाचा नामजप महत्त्वाचा ठरतो.

श्रीकृष्णाचा ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप करावा. हा नामजप होत नसल्यास ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप करावा. हा नामजप करतांना तर्जनीचे (अंगठ्याच्या शेजारच्या बोटाचे) टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे ही मुद्रा दोन्ही हातांनी करून, त्यांपैकी एका हाताने विशुद्धचक्रावर (कंठावर, म्हणजे स्वरयंत्राच्या भागावर) अंगठ्याच्या टोकाने, तर दुसर्‍या हाताने मणिपुरचक्रावर (बेंबीवर) अंगठ्याच्या टोकाने न्यास करावा.- (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

२ अ ४. त्रासाच्या तीव्रतेनुसार प्रतिदिन नामजपादी उपाय करण्याचा कालावधी
 त्रासाची तीव्रता     प्रतिदिन नामजप करण्याचा सर्वसाधारण अवधी (घंटे)
१. मंद १ ते २
२. मध्यम ३ ते ४
३. तीव्र ५ ते ६

वरील सारणीत दिलेल्या नामजप करण्याच्या सर्वसाधारण अवधीनुसार काही दिवस नामजप करूनही त्रास घटत नसेल किंवा नियंत्रणात रहात नसेल, तर नामजपाचा अवधी वाढवावा, उदा. प्रतिदिन १ ते २ घंटे नामजप करणार्‍याने प्रतिदिन ३ ते ४ घंटे नामजप करावा, प्रतिदिन ३ ते ४ घंटे नामजप करणार्‍याने प्रतिदिन ५ ते ६ घंटे नामजप करावा.

२ अ ५. त्रासनिवारणासाठी आवश्यक तेवढा वेळ नामजप करून झाल्यावर दिवसभरातील उर्वरित वेळेत करायचे नामजप : त्रासनिवारणासाठी आवश्यक तेवढा वेळ नामजप करून झाल्यावर दिवसभरातील उर्वरित वेळेत श्री गुरुदेव दत्त । हा नामजप आणि साधनेसाठी उपयुक्त असलेला नामजप करावा. त्रासनिवारणासाठीचा नामजप हा शरिरातील रोगजंतू मारणार्‍या प्रतिजैविकाप्रमाणे (अँटीबायोटिकप्रमाणे) आहे, तर साधनेसाठी उपयुक्त नामजप हा शरिराची प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या शक्तीवर्धकाप्रमाणे (टॉनिकप्रमाणे) आहे. दत्ताचा नामजप हा अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी आवश्यक आहे. दत्ताचा नामजप आणि साधनेसाठी उपयुक्त असलेला नामजप प्रत्येकी किती वेळ करावेत, हे सूत्र २ आ १ अ. त्रासाच्या तीव्रतेनुसार करायचा दत्ताचा नामजप यावरून तारतम्याने ठरवावे. त्रासनिवारणासाठीचा जप काही घंटे करायचा असल्यास तो करतांना मध्ये मध्ये दत्ताचा नामजप आणि साधनेसाठी उपयुक्त नामजप केले तरी चालतील.

२ आ. वाईट शक्तींचा त्रास नसलेल्यांनी करायचे नामजप आणि मुद्रा अन् न्यास

२ आ १. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप

२ आ १ अ. त्रासाच्या तीव्रतेनुसार करायचा दत्ताचा नामजप

१. सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला, तरी पुढे होऊ नये म्हणून किंवा थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे (तास) श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करावा.

२. मध्यम त्रास असल्यास श्री गुरुदेव दत्त । हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा.

३. तीव्र त्रास असल्यास श्री गुरुदेव दत्त । हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ घंटे करावा.  (दत्ताच्या नामजपाविषयी अधिक विवेचन सनातनचा ग्रंथ दत्त यात केले आहे.)

२ आ १ आ. दत्ताचा नामजप करतांना करायची मुद्रा आणि न्यास : दत्ताचा नामजप करतांना शक्य असल्यास पुढीलपैकी एक मुद्रा आणि न्यास करावा.

२ आ १ आ १. दत्ततत्त्व ग्रहण होण्यासाठी करायची मुद्रा आणि न्यास : अंगठ्याचे टोक अनामिकेच्या (करंगळीजवळील बोटाच्या) टोकाशी लावणे ही मुद्रा दोन्ही हातांनी करून, त्यांपैकी एका हाताने अनाहतचक्रावर (छातीच्या मधोमध) बोटांच्या टोकांनी, तर दुसर्‍या हाताने मणिपुरचक्रावर (बेंबीवर) बोटांच्या टोकांनी न्यास करावा.

२ आ १ आ २. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी करायची मुद्रा : अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) यांची टोके एकमेकांशी जुळवावीत, तर अन्य बोटे सहजासहजी सरळ रहातील तेवढी सरळ ठेवावीत.

२ आ २. आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचा नामजप आणि मुद्रा : दत्ताचा नामजप ठराविक कालावधी करून झाल्यानंतर दिवसभरातील उर्वरित वेळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पुढील नामजपांपैकी एक नामजप करावा.

२ आ २ अ. आवडत्या देवतेचा नामजप

२ आ २ आ. कुलदेवतेचा नामजप

२ आ २ इ. पूर्वीपासून करत असलेला आणि ज्याच्यामुळे काहीतरी प्रचीती आली आहे, असा नामजप

२ आ २ ई. गुरूंनी दिलेल्या नामाचा जप

(सूत्रे २ आ २ अ ते २ आ २ ई यांविषयीचे विवेचन सनातनचा ग्रंथ अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन यात केले आहे.)

२ आ २ उ. आध्यात्मिक उन्नतीसाठीचा नामजप करतांना करायची मुद्रा : आध्यात्मिक उन्नतीसाठीचा नामजप करतांना शक्य असल्यास पुढीलपैकी एक मुद्रा करावी.

२ आ २ उ १. आवश्यक असलेल्या देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी मुद्रा : हाताचे प्रत्येक बोट हे विविध देवतांशी संबंधित असते. हाताच्या पाचही बोटांची टोके जुळवून मुद्रा केल्यास आपल्याला आवश्यक असणार्‍या देवतेचे तत्त्व ग्रहण होण्यास साहाय्य होते.

२ आ २ उ २. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी करायची मुद्रा : अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) यांची टोके एकमेकांशी जुळवावीत, तर अन्य बोटे सहजपणे सरळ रहातील तेवढी सरळ ठेवावीत.

 

३. ५ – ६ वर्षांहून अधिक काळ व्यष्टी साधना
किंवा २ – ३ वर्षांहून अधिक काळ समष्टी साधना
करत असणार्‍यांनी करायचे नामजप, मुद्रा अन् न्यास

३ अ. वाईट शक्तींचा त्रास असलेल्यांनी करायचे नामजपादी उपाय

३ अ १. साधकत्व निर्माण न झालेल्यांनी करायचे नामजपादी उपाय आणि त्यांचा कालावधी

३ अ १ अ. साधकत्व निर्माण झाल्याची काही लक्षणे : काही जणांना काही वर्षे साधना केल्यानंतर असे वाटते की, आता आपण चांगले साधक बनलो; पण त्यांच्यात साधकत्वाची लक्षणे निर्माण झाली नसतील, तर त्यांनी स्वतःला चांगले साधक समजू नये. साधकत्व निर्माण झाल्याची काही लक्षणे पुढे दिली आहेत.

१. नम्रता असणारा आणि इतरांचा विचार करून योग्य कृती करणारा

२. स्वत:च्या वागण्या-बोलण्यातील आणि सेवेतील चुका प्रांजळपणे सांगणारा

३. इतरांनी लक्षात आणून दिलेल्या चुका सहजतेने स्वीकारणारा

४. दिवसभरातील स्वतःच्या चुकांचे चिंतन करणारा, त्या चुकांची खंत वाटणारा आणि चुकांसाठी प्रायश्‍चित्त घेणारा

५. स्वतःचे स्वभावदोष प्रामाणिकपणे मान्य करून ते घालवण्यासाठी आणि स्वतःमध्ये सद्गुण निर्माण करण्यासाठी सतत तळमळीने प्रयत्न करणारा

६. अपेक्षा (उदा. दुसर्‍याने मला समजून घ्यावे, माझे कौतुक व्हावे, इतरांनी मला मान द्यावा, कुटुंबातील सर्वांनी माझे ऐकावे) अल्प झालेला

७. स्वतःमध्ये शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव वाढवण्याचा प्रयत्न करणारा

वर दिल्याप्रमाणे लक्षणे स्वतःमध्ये नसल्यास पुढे दिल्याप्रमाणे उपाय करावेत.

३ अ १ आ. नामजपादी उपाय : सूत्र २ अ ३. प्रतिदिन करायचे नामजप, मुद्रा आणि न्यास पहा.

३ अ १ इ. त्रासाच्या तीव्रतेनुसार प्रतिदिन नामजपादी उपाय करण्याचा कालावधी : सूत्र २ अ ४ पहा.

३ अ १ ई. त्रासनिवारणासाठी आवश्यक तेवढा वेळ नामजपादी उपाय करून झाल्यावर दिवसभरातील उर्वरित वेळेत करायचे नामजप : सूत्र २ अ ५ पहा.

३ अ २. साधकत्व निर्माण झालेल्यांनी करायचे उपाय : सूत्र ३ अ १ अ यात सांगितलेली साधकत्वाची लक्षणे स्वतःमध्ये असल्यास पुढे दिल्याप्रमाणे उपाय करावेत.

३ अ २ अ. त्रासनिवारणासाठी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय शोधून ते करणे : शरिरात वहाणार्‍या प्राणशक्तीमध्ये अडथळे निर्माण झाल्यास व्यक्तीला विविध त्रास होतात. हे त्रास दूर होण्यासाठी या अडथळ्यांची नेमकी स्थाने शोधून तेथे उपाय करणे आवश्यक असते. प्राणशक्तीवहन उपायपद्धतीत शरिरातील प्राणशक्तीच्या वहनातील अडथळे शोधून ते दूर कसे करावेत, हे सांगितले आहे. या पद्धतीचे विवेचन सनातनचा ग्रंथ प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (२ खंड) यात केले आहे.

१. प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय शोधणे शक्य नसेल, तर सनातनच्या विकार-निर्मूलनासाठी नामजप-उपाय (३ खंड) या ग्रंथातील उपयुक्त असलेले नामजपादी उपाय निवडून ते करावेत ! : सूत्र २ अ ३ आ पहा.

२. काही कारणामुळे असे नामजपादी उपाय निवडणेसुद्धा शक्य नसेल किंवा स्वतःला असलेल्या त्रासावर उपयुक्त नामजप विकार-निर्मूलनासाठी नामजप-उपाय या ग्रंथात दिलेला नसेल, तर काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा नामजप आणि मुद्रा अन् न्यास करणे : सूत्र २ अ ३ इ १. काळानुसार आवश्यक असलेल्या श्रीकृष्णाच्या नामजपाचे महत्त्व पहा.

३ अ २ आ. त्रासाच्या तीव्रतेनुसार प्रतिदिन नामजपादी उपाय करण्याचा कालावधी आणि उपायांचा जप अन् श्रीकृष्णाचा समष्टी स्तरावरील नामजप करण्याचे प्रमाण

 ३ अ २ आ १. श्रीकृष्णाच्या समष्टी स्तरावरील नामजपाचे महत्त्व : सध्याच्या आपत्काळात वार्इट शक्तींचा प्रकोप झाला आहे. साधना करणार्‍यांना सर्वत्र ईश्‍वरी राज्य यावे, असे वाटत असते, तर वार्इट शक्तींना सर्वत्र त्यांचे राज्य यावे, असे वाटत असते. हे एकप्रकारे धर्म आणि अधर्म यांत चाललेले सूक्ष्मातील युद्धच असते. त्यामुळे साहजिकच जिज्ञासू, ५ – ६ वर्षांहून अल्प काळ व्यष्टी साधना किंवा २ – ३ वर्षांहून अल्प काळ समष्टी साधना करणार्‍यांच्या तुलनेत ५ – ६ वर्षांहून अधिक काळ व्यष्टी साधना किंवा २ – ३ वर्षांहून अधिक काळ समष्टी साधना करणार्‍यांना वार्इट शक्तींच्या आक्रमणांचा तडाखा अधिक सोसावा लागतो. त्यापासून रक्षण होण्यासाठी त्यांनी प्रतिदिन धर्मसंस्थापक श्रीकृष्णाचा समष्टी स्तरावरील नामजप करणे महत्त्वाचे ठरते.

३ अ २ आ २. त्रासाच्या तीव्रतेनुसार प्रतिदिन नामजपादी उपाय करण्याचा कालावधी : सूत्र २ अ ४ पहा.

३ अ २ आ ३. उपायांचा जप अन् श्रीकृष्णाचा समष्टी स्तरावरील नामजप प्रतिदिन करण्याचे प्रमाण : त्रासनिवारणासाठी जेवढा वेळ नामजप करणार त्याच्या ७० टक्के वेळ उपायांसाठीचा जप करावा, तर ३० टक्के वेळ सूत्र २ अ ३ इ १. काळानुसार आवश्यक असलेल्या श्रीकृष्णाच्या नामजपाचे महत्त्व यानुसार समष्टी स्तरावरील ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप आणि मुद्रा अन् न्यास करावा.

३ अ २ इ. त्रासनिवारणासाठी आवश्यक तेवढा वेळ नामजपादी उपाय करून झाल्यावर दिवसभरात उर्वरित वेळेत करायचे नामजप : दिवसभरात उर्वरित वेळेतही उपायांचा जप आणि सूत्र २ अ ३ इ १. काळानुसार आवश्यक असलेल्या श्रीकृष्णाच्या नामजपाचे महत्त्व यानुसार समष्टी स्तरावरील ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप ७० : ३० या प्रमाणात करावेत.

३ आ. वाईट शक्तींचा त्रास नसलेल्यांनी करायचे नामजपादी उपाय

३ आ १. साधकत्व निर्माण न झालेल्यांनी करायचे नामजपादी उपाय : सूत्र २ आ. वाईट शक्तींचा त्रास नसलेल्यांनी करायचे नामजप आणि मुद्रा अन् न्यास पहा.

३ आ २. साधकत्व निर्माण झालेल्यांनी करायचे नामजपादी उपाय : यांनी दिवसभरातील जास्तीतजास्त वेळ सूत्र २ अ ३ इ १. काळानुसार आवश्यक असलेल्या श्रीकृष्णाच्या नामजपाचे महत्त्व यानुसार श्रीकृष्णाचा समष्टी स्तरावरील ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप करावा. शक्य असेल तेव्हा नामजपासह सूत्रात सांगितल्यानुसार मुद्रा आणि न्यास करावा.

 

४. सूत्रे २ आणि ३ यांमध्ये सांगितलेल्या नामजपादी उपायांच्या संदर्भातील काही स्पष्टीकरणे

४ अ. काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा नामजप आदी उपाय किती कालावधीसाठी करावेत ? : काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा नामजप आणि न्यास अन् मुद्रा हे उपाय ११.६.२०१७ ते १.१२.२०१७ या कालावधीसाठी आहेत. २.१२.२०१७ पासून काळानुसार आवश्यक असणार्‍या नामजपादी उपायांच्या संदर्भातील सूचना सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय या स्तंभाखाली सनातन प्रभातच्या नियतकालिकांतून, तसेच सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर (www.sanatan.org वर) दिली जाईल.  काही कारणामुळे पालटलेले नामजपादी उपाय एखाद्याला कळू शकले नाहीत, तर त्याने नवीन नामजपादी उपाय कळेपर्यंत पूर्वी करत असलेले नामजपादी उपाय चालू ठेवावेत. त्या उपायांनी लाभ होत नाही, असे वाटल्यास काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा नामजप आणि न्यास अन् मुद्रा हे उपाय करावेत.  वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे सात्त्विक अशा धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना होईपर्यंत हे नामजपादी उपाय करायचे आहेत.

४ आ. नामजपादी उपायांविषयी कृतीच्या स्तरावर काही शंका उद्भवल्यास काय करावे ? : नामजपादी उपायांविषयी कृतीच्या स्तरावर काही शंका उद्भवल्यास सनातनचा सत्संग, सनातनचे सेवाकेंद्र अथवा सनातनचा साधक यांच्याशी संपर्क साधावा.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (५.८.२०१७)

(टीप : साधक, वाचक आदींनी ही चौकट संग्रही ठेवावी.)