एप्रिल २०१७ मध्ये केरळ राज्यात अक्षय्य तृतीयेनिमित्त सनातन संस्थेने केलेल्या धर्मप्रसारास जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद !

१. हस्तपत्रकांचे वितरण

२८.४.२०१७ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ६ हितचिंतक आणि धर्माभिमानी यांनी १ सहस्राहून अधिक हस्तपत्रके वितरित केली.

२. सनातनच्या अलंकार लघुग्रंथाची मागणी वाढली !

एका दुकानदाराने पहिल्या संपर्कातच अलंकार लघुग्रंथाच्या १०० प्रती प्रायोजित केल्या. तसेच पालक्काड आणि एर्नाकुलम् या दोन जिल्ह्यांमध्ये एकूण ३४ सुवर्णकारांना संपर्क करण्यात आला. या मोहिमेत अलंकार या लघुग्रंथाच्या १५६ प्रतींचे वितरण झाले. या ग्रंथाची मागणी अजूनही समाजातून होत आहे.

३. प्रवचनांचे आयोजन

पालक्काड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी आणि एर्नाकुलम् जिल्ह्यातील फोर्ट कोचीनमधील श्री जनार्दनस्वामींच्या मंदिरात अक्षय्य तृतीया या विषयावर प्रवचन करण्यात आले. एका साधकाच्या मित्राने अक्षय्य तृतीयेचे महत्त्व समजूून घेऊन आश्रमासाठी धान्य आणि तूप अर्पण केले.

– कु. प्रणिता सुखठणकर, केरळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात