उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये भागीरथी नदीत बस कोसळून २२ जण ठार

उत्तरकाशी : इंदूरच्या भाविकांना गंगोत्रीहून परत घेऊन येणारी एक बस महामार्गावर भागीरथी नदीत कोसळून २१ भाविकांचा मृत्यू झाला. ७ हून अधिक जण घायाळ झाले आहेत, तर ३ भाविक बेपत्ता आहेत. नालूपानीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ३१ प्रवासी असलेली बस ३०० मीटर दरीत भागीरथी नदीत कोसळली. धोकादायक वळणावर हा अपघात झाला. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे उत्तराखंड सरकारच्या माहिती अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी
निर्माण होईल आणि ‘सर्व ईश्‍वराच्या हातातच आहे’, हे राजाच्या लक्षात येईल

तिरुवण्णमलई, तमिळनाडू येथे ११.२.२०१७ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ११४’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘येणार्‍या काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी निर्माण होईल. अशी स्थिती असेल की, तेथील राजाच्या (राज्यकर्त्याच्या) हातामध्ये काहीच नसेल. तो काहीही करू शकणार नाही. ‘हे सर्व ईश्‍वराच्या हातातच आहे’, हे त्याच्या लक्षात येईल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात