दादर येथे राष्ट्रद्रोही प्रवृत्तींच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलनाचे विषय

१. काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर आक्रमण करणार्‍यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि भारतीय सेनेला विशेष अधिकार प्रदान करण्यात यावेत.

२. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांची शाळा चालवायला घेणारे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार अबू आझमी यांची चौकशी व्हावी.

विशेष उपस्थिती

श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

स्थळ : कबुतरखाना, दादर (पश्‍चिम), मुंबई.

समस्त राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात