जमशेदपूर (झारखंड) मधील कदमा येथे मंदिर स्वच्छता उपक्रम

भारतातील विविध राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

जमशेदपूर (झारखंड) : परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर हिंदु राष्ट्र जागृती अभियान चालू करण्यात आले आहे. या अंतर्गत कदमा येथील शिव मंदिरात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांसमवेत मंदिरात आलेल्या भाविकांनीही सहभाग घेतला.

क्षणचित्रे

१. मंदिर स्वच्छता होत असल्याचे पाहून मंदिर समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

२. मंदिरात आलेल्या एका १० वर्षांच्या मुलीने तिच्या आईसमवेत स्वच्छता केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात