अकोला येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान

अकोला : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाक्षिक बैठकीत सनातनचे साधक प्रा. श्रीकांत भट यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. १४ मे या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता बी.आर्. हायस्कूलच्या प्रांगणात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर पाटणकर, श्री. विद्याधर धनागरे, उपाध्यक्ष जे.ना. संघ, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते. संघाचे सचिव जयंत जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

क्षणचित्रे

१. अकोल्यात पुष्कळ तापमान असूनही सर्व ज्येष्ठ नागरिक व्याख्यान संपेपर्यंत उपस्थित होते.

२. उपस्थितांनी व्याख्यान आवडल्याचे सांगून आजपर्यंत असे व्याख्यान कधी ऐकले नव्हते, असा अभिप्राय दिला

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात