भांडुप (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याचा हिंदूंचा निर्धार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

भांडुप येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत उपस्थित धर्माभिमानी हिंदू

हिंदु राष्ट्र स्थापनेची ललकारी आसमंतात घुमत असतांना त्याचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी संकल्पानेच ‘हिंदु राष्ट्र’ या विषयाच्या आदानप्रदानाला देशभरातून चालना मिळत आहे. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या निर्मिती कार्याची पार्श्‍वभूमी सिद्ध होण्यासाठी लागणारे वैचारिक पाठबळ देणार्‍या, हिंदूंचे संघटन करणार्‍या आणि सर्वांत महत्त्वाचे चैतन्यस्रोताचे प्रोक्षण करणार्‍या हिंदु राष्ट्र जागृती सभा सर्वत्र होत आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत भांडुप येथील कोकणनगर मित्र मंडळाच्या पटांगणात १३ मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतूनही हिंदुत्वनिष्ठांच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेचे चैतन्यदायी धर्मबीज रोवले गेले ! त्याचा हा थोडक्यात वृत्तांत…

सभेच्या आरंभी धर्माभिमानी श्री. शिवगणेश तिवारी यांनी राष्ट्रसंकटांना शह देण्याची क्षमता जागृत करणारा शंखनाद केल्याने उपस्थितांमध्ये स्फूल्लिगं चेतले. सभा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता आणि विघ्नहर्ता श्रीगणेश यांच्या चरणी तळमळीने प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर भावपूर्ण वातावरणात दीपप्रज्वलन झाले. या सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी केले. समितीचे श्री. किशोर औटी यांनी हिंदु जनजागृती समितीचे चैतन्याचे तेज पसरवणारे दैवी कार्य संतांच्या संकल्पानेच कसे उत्तरोत्तर वाढत आहे, याविषयी माहिती सांगितली.

श्री. शिवगणेश तिवारी

सामर्थ्य आणि साधनेचे बळ प्राप्त करून हिंदु राष्ट्राच्या
स्थापनेसाठी हिंदूंनी सिद्ध व्हावे ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

श्री. प्रसाद वडके

आज भारतमाता संकटात असतांना देशाचा तरुण ‘आयपीएल’चे सामने पहाण्यात मग्न आहे. तो व्यसन आणि पाश्‍चात्त्य विकृती यांच्या आहारी गेला आहे. ‘करिअर’ घडवण्यात व्यस्त असलेल्या पालकांना पाल्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीमुळे स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्माचरणापासून दूर नेले. परिणामी हिंदु तरुण स्वत:तील धर्मतेज हरवून बसला आहे. हिंदूंपुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे, प्रभु श्रीरामचंद्र आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या श्रेष्ठ जीवनशैलीचा आदर्श आहे. आज पुन्हा इतिहासाचा जागर करण्याची वेळ आली आहे. यासाठी हिंदूंनी सामर्थ्य आणि साधनेचे बळ प्राप्त करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्ध व्हावे.

धर्मजागृती सभांचे महत्त्व !

धर्मजागृती सभा या चैतन्याच्या स्तरावर होता. या सभांमुळे अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटित होतात. या संघटनामुळे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यास साहाय्य होते !

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संविधानिक
अधिकार ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

सौ. नयना भगत

८० प्रतिशतहून अधिक हिंदू असलेल्या भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हे असंविधानिक असल्याची आवई पुरोगामी, निधर्मी, अन्य पंथीय आणि प्रसारमाध्यमे उठवतात; मात्र समाज आणि राष्ट्र यांच्या हिताची संकल्पना मांडणे, हे पूर्णत: संविधानिक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून राजकीय आणि सामाजिक असे कोणतेही परिवर्तन करण्यास राज्यघटनेने पूर्णत: स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संविधानिक अधिकार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द अंतर्भूत केले. घटनादुरुस्तीद्वारे जर भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ बनवता येते, तर अशीच एक घटनादुरुस्ती करून ‘हिंदु राष्ट्र’ का होऊ शकत नाही ?

कृतीप्रवण होणारे हिंदू !

धर्मजागृती सभांमध्ये उपस्थित असणार्‍या धर्माभिमानी हिंदूंमधील धर्मतेज जागल्याने ते धर्महानी रोखण्यासाठी ते वैध मार्गाने कृती करण्यास सिद्ध होतात !

प्रतिसाद !

क्षात्रतेज आणि धर्मतेज यांच्या लहरी वातावरणात प्रक्षेपित करणार्‍या या सभेला १६० धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली, तर फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सभेच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ २४ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंनी घेतला.

प्रसारात सहभाग !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्वश्री सचिन घाग, गणेश पाटील, शिवगणेश तिवारी, अक्षय सौदे, संदेश घाडीगावकर, विनायक साळुंखे, मयुर सरवदे आदी धर्माभिमान्यांनी सभेला हातभार लावला.

कृतज्ञता !

समाजातील महनीय व्यक्ती किंवा इतर राजकारणी अथवा कलाकार हे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःला केंद्रभूत ठेवून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मात्र असे काही न करता हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी अल्पच !

सहकार्य !

या सभेसाठी गुरु आशिष डेकोरेटर्स आणि कोकणनगर मित्र मंडळ यांनी सभेकरिता सभागृह, आसंद्या, पटल, बैठका आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिली, तर धर्माभिमानी श्री. प्रदीप उपाध्याय सभेसाठी पाण्याच्या ५ डझन सीलबंद बाटल्या अर्पण केल्या.

उपस्थित मान्यवर !

सभेला पंचमुखी सेवा संस्थानचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ कदम, विश्‍व हिंदू सेवा संघाचे मुंबईचे प्रदेश प्रभारी श्री. इंद्रजीत यादव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या स्थापनाकार्यातील त्यांच्या सहभागाची ग्वाही दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात