परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या कृपाशीर्वादाने देशविदेशात चालू असलेला हिंदु धर्मप्रसार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेल्या स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आज जगभरात १४ देशांत धर्मप्रसार चालू आहे. या देशांतील जिज्ञासूंसाठी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून १० विदेशी भाषांतून ५४ साप्ताहिक सत्संग घेतले जातात. आता विदेशातील जिज्ञासूही धर्माचरण करत आहेत. गुढीपाडवा, श्राद्ध, विवाह आदी विधी ते विदेशातही हिंदु धर्मानुसार करत आहेत. एस्.एस्.आर्.एफ्.च्या माध्यमातून साधना करून आतापर्यंत १७ साधकांनी ६० टक्के अन् त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तर ४ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. अमेरिका आणि क्रोएशिया या देशांत ५ दिवसांचे शिबीर आणि नियमित प्रसारकार्य चालू आहे. spiritualresearchfoundation.org या संकेतस्थळाला महिन्याला देश-विदेशातील अनुमाने १० लाख वाचक भेट देत असतात. अशा प्रकारे एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याने आता गरुडझेप घेतली असून त्याद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीचा लाभ जगभरातील जिज्ञासूंना होत आहे.

अद्वितीय शिकवणीद्वारे देश-विदेशातील जिज्ञासूंना मोक्षमार्ग दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

 

विश्‍वाला सोप्या आणि शास्त्रीय परिभाषेत हिंदु धर्म अन् अध्यात्म
यांविषयी माहिती देत व्यक्तीगत आध्यात्मिक उन्नती साधणे,हेच एस्.एस्.आर्.एफ्.चे ध्येय आहे !

संतपद प्राप्त केल्याविषयी युरोप येथील साधिका सौ. योया वाले यांचा सन्मान करतांना पू. लोला
क्रोएशिया येथे झालेेली साधकांची कार्यशाळा
हिंदु धर्मानुसार श्राद्धविधी करतांना युरोपातील साधक श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच
गुढीपूजन करतांना बोलिव्हिया येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सिल्विया दत्तोली

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात