टोरंटो (कॅनडा) येथे एफ्एम् रेडियोच्या माध्यमातून सनातनच्या साधिकेकडून धर्मप्रसार

शिवमंदिरातील सत्संगात बोलतांना सौ. उमा रविचंद्रन्
टोरंटो येथील एफ्एम् रेडियो वरून मार्गदर्शन करतांना सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन्

चेन्नई : टोरंटो येथील ‘आयटीआर एफ्एम्’ आणि ‘टाईम एफ्एम्’ यांच्यावरून सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी अध्यात्मप्रसार केला.

सौ. रविचंद्रन् गेल्या २ वर्षांपासून ‘आयटीआर् एफ्एम्’ या आंतरराष्ट्रीय तमिळ रेडिओ वाहिनीसाठी नियमित सत्संग घेत आहेत. त्या टोरटो येथे गेले असता ‘आयटीआर्.एफ्एम्’चे निवेदक श्री. सुरेशजी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी लगेच ‘टाईम एफ्एम्’ आणि ‘आयटीआर् एफ्एम्’वर तमिळमध्ये दोन सत्संगांचे प्रसारण केले. ‘टाईम एफ्एम्’वरील सत्संगाचा विषय होता ‘अक्षय्य तृतीया, प्रदोषचे महत्त्व आणि कलियुगातील उपयुक्त साधना.’

‘टाईम एफ्एम्’च्या मालकांनी प्रत्येक आठवड्याला सत्संग चालू करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘आयटीआर् एफ्एम्’वरील सत्संग चर्चात्मक होता. या सत्संगात सहभागी झालेल्या जिज्ञांसूंनी त्यांच्या अनुभूती कथन केल्या. तसेच शंकानिरसनही करून घेतले. एका जिज्ञासू महिलेने अनुभूती सांगतांना तिच्या अंध आणि आजारी पतीला नियमित सत्संग ऐकून शांत वाटत असल्याचे सांगितले.

सौ. रविचंद्रन् यांना श्री. सुरेशजी येथील शिव मंदिरात नेले होते. तसेच येथील मंदिराच्या विश्‍वस्तांशी भेट घडवली. त्या दिवशी प्रदोष होता. त्या वेळी प्रदोषचे महत्त्व, अक्षय्य तृतीया, आचारधर्माचे महत्त्व, साधनेचे महत्त्व, कलियुगामध्ये नामजपाचे महत्त्व, दोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांवर एक विशेष सत्संग घेण्यात आला. सत्संगानंतर काही जिज्ञासूंनी शंकानिरसन करून घेतले. सत्संगाच्या वेळी अनुमाने १०० जिज्ञासू उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात