सद्गुरु पू. श्रीराम महाराज (बडवाह, मध्यप्रदेश) यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद !

सद्गुरु पू. श्रीराम महाराज

अकोला : मी सनातनच्या रामनाथी आश्रमात जाऊन आलो आहे. मला सनातनचे कार्य ठाऊक आहे. सनातनच्या कार्याला माझा आशीर्वाद आहे, असे उद्गार सद्गुरु पू. श्रीराम महाराज यांनी काढले. सनातनच्या साधिकांनी येथे त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ आणि दैनिक सनातन प्रभातचा अक्षय्य तृतीयेचा विशेषांक भेट देण्यात आला.

सद्गुरु पू. श्रीराम महाराज यांना प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले आहे. प.पू. गोंदवलेकर महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह देण्याचा अधिकारही दिलेला आहे. रामनामाच्या प्रसारार्थ त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या सिद्धमंत्राची १३ कोटी जपयज्ञाची अनेक अनुष्ठाने साधकांकडून पूर्ण करवून घेतली आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात