राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वृद्धींगत होत असलेले धर्मप्रसाराचे कार्य

सनातन संस्थेच्या वतीने धर्मजागृती

१. प्रवचने

अ. हरियाणातील गुरुग्राम येथील राधाकृष्ण मंदिर, घाटा गाव सेक्टर ५५ मध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रवचन करण्यात आले. गुरुग्राम येथील वाचक श्री. मुरारी पंचलंगिया यांच्या वतीने कीर्तनासाठी येणार्‍या महिलांसाठी हे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

आ. हरियाणामधील फरिदाबाद येथे श्री. अशोक शर्मा यांच्या घरी प्रवचन घेण्यात आले.

२. ग्रंथप्रदर्शने

अ. देहली येथील ग्रेटर कैलाश येथे सनातन धर्म मंदिरात ग्रंथ आणि फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले.

आ. हरियाणामधील गुरुग्राम येथील न्यू कॉलनी येथे गीता भवन मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा ५० जिज्ञासूंनी लाभ घेतला, तसेच फरिदाबाद येथे एकूण ३ ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

इ. नोएडा येथील सनातन धर्म मंदिर, तसेच न्यू कोंडली येथील सी-ब्लॉक येथील शिवशक्ती मंदिरातही ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

ई. पुष्पविहार येथील शिवमंदिरात गायत्री परिवाराच्या वतीने भागवत पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

उ. नोएडा येथील जयपूरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतही ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

– सौ. तृप्ती जोशी आणि कु. मनीषा माहुर, देहली

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात धर्माभिमान्यांचा सहभाग

१. राष्ट्रीय हिंदू आंदोलन

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या.

अ. संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे देशाच्या कोट्यवधी रुपयांची होणारी हानी खासदारांच्या वेतनातून वसूल करावी.

आ. मुसलमानांना हजयात्रेसाठी दिले जाणारे अनुदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करावे.

इ. केरळ येथील साम्यवादी आणि धर्मांध हे हिंदु नेत्यांच्या हत्या करत आहेत. ही आक्रमणे म्हणजे हिंदुविरोधी षड्यंत्रे आहेत. या हत्यांचा सीबीआयकडून तपास केला जावा.

ई. हिंदुद्वेषाने ग्रस्त होऊन पाठ्यपुस्तकांतून देवतांची नावे वगळणार्‍या बंगाल पाठ्यपुस्तक मंडळाविरुद्ध कारवाई केली जावी आणि वगळलेल्या शब्दांचा अभ्यासक्रमात पुन्हा समावेश केला जावा.

२. व्हॅलेंटाईन डेच्या विरोधातील मोहीम

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे विकृत स्वरूपात सादरीकरण करण्यात येत असल्यामुळे सध्या एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड केली जात आहे आणि त्यांच्यावर हिंसक आक्रमणे केली जात आहेत, तसेच या दिवशी होणार्‍या मेजवान्यांमध्ये तरुण-तरुणींकडून मद्यपान, धूम्रपान आणि मादक पदार्थ यांचे सेवन करणे, यांसारख्या अनिष्ट प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्यांच्या या कुप्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी हरियाणातील गुरुग्राम येथील ६ शाळा, पोलीस आयुक्त आणि फरिदाबाद येथील १५ महाविद्यालये, पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त, उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील ३ शाळा आणि २ पोलीस आयुक्त यांना निवेदने देण्यात आली. सहस्रो जणांना हस्तपत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. नवी देहलीमधील लक्ष्मीनगर मेट्रो स्टेशन येथील बजरंग दलाचे श्री. दीपक सिंह, इतर २ कार्यकर्ते यांच्यासह हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हस्तपत्रकांचे वितरण केले. ही पत्रके आणि हस्तफलक वाचून मेरठ येथील महाविद्यालयातील एक प्राध्यापक अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी आमंत्रित केले. नोएडा येथील वेव्ह सिटी सेंटर मेट्रो स्टेशन येथे पत्रकांचे वितरण करण्यात आले. हरियाणामधील फरिदाबाद येथे २ ठिकाणी हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. या अभियानात महिलांचा सहभाग अधिक असल्याने स्थानिक वर्तमानपत्रांतूनही या अभियानाला प्रसिद्धी मिळाली. नोएडा आणि गुरुग्राम येथे या विषयावर प्रवचनांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.

– श्री. कार्तिक साळुंके, देहली

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात