आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातील मूल होण्याच्या संदर्भातील अभ्यासक्रमाविषयी आक्षेप !

ऋषीमुनींपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणारे तथाकथित बुद्धीवादी सामाजिक कार्यकर्ते

मुंबई : आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातील मूल होण्याच्या संदर्भातील अभ्यासक्रमाविषयी ‘डिस्ट्रिक सुपरवायजर ऑफ प्री-कन्सेप्शन अॅीण्ड प्री-नेटल डायग्नोस्टीक टेक्निक्स (पीसीपीएनडीटी) अॅक्ट’चे सदस्य गणेश यांनी हरकत घेतली आहे. (प्राचीन काळी निर्माण झालेल्या अत्यंत प्रगत आयुर्वेद शास्त्राविषयी अभिमान बाळगण्याचे आणि त्याविषयाचा सखोल अभ्यास करून पुढील संशोधन करण्याचे सोडून त्यावर आक्षेप घेणारे गणेश यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. पाश्चात्त्य संशोधक भारतातील प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून आधुनिक शोध लावतात, तर भारतातील तथाकथित पुरोगामी स्वतःकडील प्राचीन ज्ञानावरच आक्षेप घेतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

चरक संहिता या प्राचीन ग्रंथातून मुलगा होण्याच्या संदर्भातील मजकुराचा पाठ्यक्रम आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. या संदर्भात टीका आणि थट्टा करून गणेश यांनी याला आक्षेपार्ह म्हटले आहे. गणेश हे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या ‘लेक लाडकी’ अभियानाशी संबंधित आहेत.

नाशिकच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफ हेल्थ सायन्स आणि नांदेडच्या डॉ. शंकरराव मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैस्कर यांच्या देखरेखित हा आयुर्वेदाचा अभ्यासक्रम सिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नर भ्रूण सिद्ध करण्याविषयीच्या आणि मूल होण्याविषयीच्या अनेक प्रक्रिया अन् औषधे सांगितली आहेत.

‘अनेक लोक अॅ्लोपॅथी ऐवजी आयुर्वेद उपचाराला प्राधान्य देतात. अशा वेळी जर डॉक्टरांना हे शिकवले जाणार असेल, तर देवच समाजाचे रक्षण करू शकतो’, अशी प्रतिक्रिया गणेश यांनी व्यक्त केली आहे. ‘पीसीपीएन्डीटी अॅणक्ट’ने या प्रकाराची दखल घेतली आहे; मात्र पुस्तकातील हा भाग पुढच्या शैक्षणिक सत्रातच वगळला जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात