अनंत रूपांनी नटलेले अनंतकोटी ब्रह्मांडनायक परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त…

१. परात्पर गुरु डॉ. आठवले भक्तवत्सल असल्यामुळे ते
काळानुरूप आवश्यकता ओळखून अनंत रूपांनी साधकांसाठी प्रगट होत असणे

ईश्‍वर हा अनंत रूपांनी नटलेला आहे; म्हणून त्याचे एक नाव अनंत असे आहे. तसेच प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) हेही भक्तवत्सल असल्यामुळे काळानुरूप आवश्यकता ओळखून अनंत रूपांनी साधकांसाठी प्रगट (अवतरित) होतात.

२. अनंत रूपांनी नटलेल्या श्रीकृष्णाला गोकुळात कुणीही ओळखू
न शकणे, तद्वत् सध्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनेक जण ओळखू न शकणे

कधी ते सगुणातून, तर कधी निर्गुणातून साधकांवर कृपादृष्टी ठेवून असतात; म्हणून ज्या साधकांनी प.पू. गुरुदेवांना स्थुलातून पाहिलेले नाही, त्यांनासुद्धा त्यांच्याविषयी अनुभूती येतात. समाजातील अनेक थोर संत, महात्मे, अधिकारी पुरुष (अध्यात्ममार्गातील व्यक्ती), महाराज आदी श्रेष्ठ व्यक्तीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ओळखू शकलेले नाहीत. गोकुळातही काही जण भगवान श्रीकृष्णाला ओळखू शकले नाहीत. त्यामुळे ते श्रीकृष्णाला एक गवळ्याचे पोर !, असेच म्हणत असत. अनंत रूपांनी नटलेल्या श्रीकृष्णाला जसे ते ओळखूच शकले नाहीत, अगदी तशीच आजची स्थिती झाली आहे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कार्यरत असणारी अनंत रूपांपैकी काही रूपे !

अ. ज्ञानाची चौकट प्रसारित करणारे श्री. राम होनप हेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच एक रूप आहे आणि एक विद्वान या टोपण नावाखाली ज्ञान देणारेही परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.

आ. गुरु आणि सद्गुरु या पदांवर आरूढ झालेले सनातनचे संत म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचीच रूपे आहेत.

इ. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके ईश्‍वराकडे जाण्याचे मार्ग आहेत. सर्व साधकांमध्येही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच रूप वावरत आहे.

ई. रामनाथी आश्रमावरील कळस आणि ध्वज हीही त्यांचीच रूपे आहेत.

म्हणूनच प.पू. गुरुदेवांचा जयजयकार अनंतकोटी ब्रह्मांडनायक, असा करणेच उचित ठरणारे आहे.

जय गुरुदेव ।

– प्रा. श्रीकांत भट, अकोला (८.१२.२०१६, सायं. ६.३०)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात