हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना

पेण, रायगड येथील गणपति मंदिरात प्रवचन

पेण – येथील रामवाडी गावातील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर श्री. मनीष माळी यांनी प्रवचन घेतले. धर्माभिमानी महिलांनी प्रवचनाचा लाभ घेतला. शेवटी सर्वांनी सामूहिकरित्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली.

क्षणचित्रे

१. आठवड्यातून एकदा सामूहिकरित्या प्रार्थना करण्याचे धर्माभिमान्यांकडून निश्चित

२. जिज्ञासूंनी समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येण्याची सिद्धताही दर्शवली.

 

वशेणी (जिल्हा रायगड) येथे वास्तूशांतीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन

वशेणी (तालुका उरण) – येथे धर्मशिक्षण वर्गात येणारे धर्माभिमानी श्री. यशवंत राधेश्याम ठाकूर यांच्या घरी वास्तूशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ३० जिज्ञासूंनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

 

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदुराष्ट्राचे निर्माण आणि पोषण होईल !’

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात