पंढरपूर येथे अध्यात्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर मार्गदर्शन

पंढरपूर  – तालुक्यातील मौजे आजोती येथे २७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर श्री. आप्पासाहेब सांगोलकर, तर ‘हिंंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाचा लाभ ६० हून अधिकांनी घेतला. ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन ५०० ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आले. या वेळी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

 

क्षणचित्रे

१. आजोती येथील शंकर चव्हाण यांनी पायी घरोघरी जाऊन स्वत:हून प्रसार केला आणि मार्गदर्शनाच्या ठिकाणी वीज अन् ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली.

२. व्यवसायात व्यस्त असूनही श्री. राजेंद्र पाटील यांनी व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे निमंत्रण पाठवले.

३. मार्गदर्शन ऐकण्यासाठी श्री. आप्पा घाटुळे (वय ८७ वर्षे) हे २ किलोमीटर अंतरावरून आले होते. त्यांनी स्वतःच्या परिचयातील विद्यालयांना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट घेण्याविषयी विचारले. त्यावर विद्यालयेही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

४. मार्गदर्शन रात्रीच्या वेळी असूनही जिज्ञासू महिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि गावात धर्मशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली.

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात