साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा छळ करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘साध्वी का सुटली ?’ या विषयावरील चर्चासत्र

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मिळाल्याने तथाकथित हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांना पोटशूळ

श्री. अभय वर्तक

मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना १५ दिवस अटक न दाखवता कारागृहात ठेवण्यात आले. त्यानंतरही त्यांचा कारागृहात अनन्वित छळ करण्यात आला. अनेक उच्चपदस्थ अधिका-यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा तपास केला असतांनाही राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्आयए’कडे) साध्वींच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत. या प्रकरणी साध्वी आणि अन्य १२ जणांना अटक करून त्यांचा छळ करणा-या अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केली. ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘साध्वी का सुटली ?’ या विषयावरील आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. (चर्चासत्राच्या नावामधूनच हिंदु साधू-संत यांच्याविषयी वृत्तवाहिन्यांमध्ये किती तिरस्कार आणि हिंदुद्वेष दिसून येतो. मौलवी अथवा अन्य धर्मांच्या धर्मगुरूंविषयी असा एकेरीपणाचा उल्लेख करण्याचे धाडस वृत्तवाहिन्या करू शकतील का ? – संपादक) या वेळी भाजपच्या विधी न्याय विभागाचे प्रमुख आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचे पूर्वीचे अधिवक्ता गणेश सोवनी, ‘एम्आयएम्’चे आमदार अधिवक्ता वारीस पठाण, ‘द वीक’चे वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले हे उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन नीलेश खरे यांनी केले.

 

श्री. अभय वर्तक यांनी केलेला सडेतोड प्रतिवाद

१. कारागृहात असतांना साध्वींचा अनन्वित छळ करत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यांना अश्लील चित्रफिती दाखवण्यात आल्या. हे सर्व चीड आणणारे आहे. साध्वी कर्करोगग्रस्त असून त्यांना योग्य ते उपचार दिले गेले नाहीत. त्यांना जो त्रास दिला गेला, त्यांचे दुष्परिणाम त्या गेली ८ वर्षे ६ मास भोगत आहेत.

२. आतंकवादविरोधी पथकाने एका हिंदुत्वनिष्ठ साध्वीला आयुष्यातून उठवले आहे.

३. साध्वी या खुर्चीत बसलेल्या असतांना त्यांना आतंकवादविरोधी पथकाच्या एका अधिका-याने लाथ मारून खाली पाडले आणि त्यामुळे त्यांच्या कमरेखालचा भाग निकामी झाला आहे. त्याच अधिका-याला पुढे २० लक्ष रुपयांची लाच घेतांना अटक करून निलंबित करण्यात आले. पथकाच्या अधिका-यांनी साध्वींचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून जो छळ केला, त्याविषयी कोणीच काही बोलत नाही.

४. ‘भगवा आतंकवाद’ असा चुकीचा शब्दप्रयोग करणारे वारीस पठाण यांनी हा शब्दप्रयोग मागे घ्यावा. पी. चिदंबरम्, आतंकवादविरोधी पथकाचे हेमंत करकरे आणि वारीस पठाण यांच्यासह अनेकांनी ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह, धनंजय देसाई यांच्यापासून ते सनातनच्या साधकांना अटक करण्यात आली. या सर्वांची अटक ही त्या षड्यंत्राचा भाग आहे.

५. ‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात नसतांना त्याविषयी बोलले जात असेल, तर संपूर्ण जगाला ‘हिरव्या आतंकवादा’ने ग्रासले असतांना त्याविषयी वारीस पठाण बोलतील का ?

६. कर्नल पुरोहित यांच्यावर सैन्याने ‘कोर्ट मार्शल’ चालवले आणि त्यामध्ये निर्दोष आढळले आहेत.

७. मालेगाव स्फोटातील ज्या मुसलमान आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे, त्यातील अनेक आरोपी अद्यापही पसार आहेत.

८. कोणत्याही हिंदू वा मुसलमान व्यक्तीला ती निर्दोष असतांना त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. कुठल्याही प्रकारची हिंसा कोणीही करू नये. संवैधानिक मार्गाने न्याय मिळवू शकतो. न्यायव्यवस्थेविषयी काहीतरी चुकीचे बोलून आरोप केले जात आहेत. न्याययंत्रणेने जो निर्णय दिला आहे, तो पुरावे आणि अन्य गोष्टी पडताळूनच दिलेला आहे.

९. साध्वी प्रज्ञासिंह यांनी स्वतः सांगितले आहे की, ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांना न्यायालयातून वैद्यकीय उपचारासाठी नेतांना त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी देशातील काही लोक प्रयत्न करत आहेत.

१०. साध्वी प्रज्ञासिंह वा सनातनचे साधक असो, त्यांच्यावरील खटला लवकर चालावा, अशी आमची मागणी आहे.

 

‘एन्आयए’कडून कोणताही दुजाभाव नाही ! – अधिवक्ता गणेश सोवनी

या प्रकरणी कोणताही राजकीय किंवा हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून दबाव आणलेला नाही. मालेगाव स्फोट प्रकरणातील तत्कालीन शासकीय अधिवक्ता रोहिणी सालियन यांना ‘न्यायालयीन प्रक्रियेत हळूवारपणे पुढे जाण्यास सांगितले होते’, ते एका ठराविक गोष्टींसाठी होते. त्यांना जेव्हा वरील प्रक्रिया सांगण्यात आली होती, त्यानंतर त्या ९ मास गप्प का होत्या ? या प्रकरणी ‘एन्आयए’कडून दुजाभाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; कारण साध्वींना जामीन दिला; परंतु ‘एन्आयए’ने कर्नल पुरोहित यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे, ही वस्तुस्थिती आहे. जर दुजाभाव करायचाच असता, तर दोघांनाही ‘क्लीन चिट’ दिली असती; परंतु तसे झालेले नाही; मात्र तसे सांगून वातावरणनिर्मिती केली जात आहे. तसेच या प्रकरणात साध्वींच्या विरोधातील जे तथाकथित चित्रीकरण दाखवण्यात आले होते, त्यात साध्वी सहभागी नाहीत. या संपूर्ण प्रकरणी यंत्रणेने जो अहवाल न्यायालयात दिला आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली आहे, ते आता कोणतेही पुष्टीकरण देऊ शकत नाही.

 

साध्वींच्या जामिनावर आमदार अधिवक्ता वारीस पठाण यांचा जळफळाट !

१. हेमंत करकरे यांनी केलेले अन्वेषण योग्य होते. त्यानंतर ‘एन्आयए’ने ‘साध्वी आणि अन्य जणांवर ‘मकोका’ लावू शकत नाही’, असे कसे सांगितले ?

२. मुंबईत झालेल्या वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी रुबिना मेमन यांच्या नावावर गाडी होती; म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेली आणि मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वींना जामीन मिळतो, हा कोणता न्याय ? (यावरून पठाण यांचा न्याययंत्रणेवर विश्वास नाही, असेच दिसून येते. न्यायालयाच्या विरोधात बोलणार्‍या पठाण यांच्यावर शासनाने न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करायला हवी ! – संपादक)

३. मालेगाव स्फोटातूनच ‘भगवा आतंकवाद’ पुढे आला. (‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात असता, तर वारीस पठाण यांचे असे बोलण्याचे धाडस तरी झाले असते का ? – संपादक) कोणताही आतंकवाद हा निषेधार्ह असून मुसलमानांवर आतंकवादाचा डाग लावला जात आहे. (आतंकवादी कृत्यांमध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेले आतंकवादी कोण आहेत, हे जगाला माहीत आहे ! – संपादक) या प्रकरणात रा.स्व. संघाचा ‘भगवा आतंकवाद’ आहे, हे दिसून येते.

४. जामिनाच्या विरोधात शासनाने सर्वोच्च न्यायालयात जायला हवे. (हीच मागणी पठाण यांनी वर्ष २००६ मधील मालेगाव स्फोट प्रकरणातून सुटलेल्या  मुसलमानांविषयी करतील का ? – संपादक)

 

यंत्रणेच्या तपासाविषयी प्रश्न उपस्थित करणारे निरंजन टकले

‘आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या अन्वेषणावर
‘एन्आयए’ने विश्‍वास ठेवलेला नाही, हे आश्चर्यकारक आहे !’

आरोपींच्या विरोधातील पुरावे ‘एन्आयए’कडे आहेत. त्यामुळे पथकाने केलेल्या अन्वेषणाप्रमाणे खटला चालवायला हवा. साध्वींना जामीन दिलेला आहे, निर्दोषत्वाचा निकाल दिलेला नाही. आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या अन्वेषणावर ‘एन्आयए’ने विश्वास ठेवलेला नाही, हे आश्चर्यकारक आहे. आतंकवादाला रंग नसतो आणि जरी रंग असला, तरी तो एकमेकांना पोसतच असतो. आतंकवादाला रंग लावणे, हा प्रचारकी थाट आहे. कर्नल पुरोहित यांना कोठडीत ठेवण्यासाठी कोणतेही सबळ कारण नाही, असेही ‘एन्आयए’ने प्रतिज्ञापत्र न्यायालयात प्रविष्ट केले आहे. त्यामुळे पुढे त्यांनाही जामीन मिळू शकेल.

 

सूत्रसंचालक नीलेश खरे यांची हिंदुद्वेषी विधाने !

१. साध्वी प्रज्ञासिंह या दोषमुक्त झालेल्या नाहीत. त्यामुळे आनंद साजरा करू नका. सनातन किंवा अन्य कोणीही आनंद व्यक्त करू नये.

२. ज्याप्रमाणे ‘इस्लामिक आतंकवाद’ वाढत आहे, त्याप्रमाणे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही संतापी हिंदूंकडून ‘हिंदुत्ववादी आतंकवाद’ पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून ‘भगवेकरण आतंकवादा’चा प्रयत्न केला जात आहे का ?

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात