वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा

वर्धा – येथे १८ एप्रिलला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांच्या पायाभूत सुविधांसाठी केलेल्या निधीची तरतूद रहित करावी, परकीय आक्रमकांनी दिलेली अंदमान-निकोबार बेटांसह भारतातील शहरे, वास्तू यांची नावे, तसेच परकीय आक्रमकांच्या नावे दिलेले रस्ते, स्थानके आदींची नावे पालटावीत आणि श्रीरामजन्मभूमी येथे पूजा करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. धर्माभिमानी देत असलेल्या घोषणा रस्त्यावरून येणारे-जाणारे थांबून ऐकत होते. आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय दाणी यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

नागपूर येथेही राष्ट्रीय हिंदू आंदोलन

नागपूर

नागपूर येथेही वरील मागण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सौ. मंगला पागनीस यांनी, तर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अतुल आर्वेन्ला यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात