सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘हिंदु राष्ट्र आणि अडचणी’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग

इंदूर (मध्यप्रदेश) – हिंदु राष्ट्र हा सध्याच्या काळातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. हिंदुत्वनिष्ठ असलेले योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर या विषयावरील चर्चेचा स्तर आणि क्षेत्र अधिकच विस्तारले आहे. सर्वसामान्य लोकांना हिंदु राष्ट्र ही संकल्पना अधिक सुस्पष्ट व्हावी, यासाठी ‘स्टेट प्रेस क्लब’च्या वतीने येथील प्रीतमलाल दुआ सभागृहामध्ये ‘हिंदु राष्ट्र आणि अडचणी’ याविषयी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २० एप्रिल या दिवशी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी होणा-या या चर्चासत्रामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, भोपाळ येथील राष्ट्रीय एकता समितीचे उपाध्यक्ष श्री. रमेश शर्मा, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राहुल कोठारी आणि दुर्गा वाहिनीच्या क्षेत्रीय संयोजिका सुश्री मालासिंह ठाकूर सहभागी होणार आहेत.

या परिसंवादात हिंदु राष्ट्र म्हणजे काय ? हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ? हिंदु राष्ट्राची स्थापना कोण करेल ? हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने आजच्या समस्यांवर उपाय मिळेल का ? हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात कोणत्या वैचारिक आणि भौतिक अडचणी आहेत ? या विषयांवर परिसंवादात चर्चा करण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात