आंध्रप्रदेश येथे चालू असलेले धर्मप्रसाराचे कार्य

 

१. क्रांतीकारकांविषयी माहिती देणा-या फलकांचे प्रदर्शन लावणे

इंदूर (निजामाबाद) केंद्रात हरिचरण मारवाडी स्कूल येथे क्रांतीकारकांविषयी माहिती देणा-या फलकांचे (फ्लेक्सचे) प्रदर्शन लावण्यात आले होते. शाळेच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने या शाळेतील एक धर्माभिमानी शिक्षक श्री. घनःश्याम व्यास यांनी या प्रदर्शनाचे नियोजन केले होते.

 

२. तिरुपती येथील ग्रंथ मेळाव्यात
सनातन-निर्मित सात्त्विक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावणे

तिरुपती येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ मेळाव्यात सनातन-निर्मित सात्त्विक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये धर्मशिक्षण देणा-या फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या ग्रंथ मेळाव्याच्या पहिल्या दिवशी टी.टी.डी. (तिरुमला तिरुपती देवस्थानम्) चे कार्यकारी अधिकारी डॉ. सांबशिवा राव (आय.ए.एस्.) यांनी सनातनच्या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांविषयी जाणून घेतले.

या ११ व्या ग्रंथ मेळाव्यात विविध ८० संस्थांनी आपापले ग्रंथप्रदर्शन लावले होते.

– सौ. मीना कदम आणि श्री. चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश