हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शौर्याचा वारसा जपायला हवा ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

भोपाळ येथे धर्मरक्षक संघटनेची भव्य भगवा शौर्य यात्रा !

व्यासपिठावर श्री जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी (१), पू. साध्वी सरस्वतीजी (२), श्री. अभय वर्तक (३) आणि उपस्थित मान्यवर

भोपाळ – आपले जन्मोजन्मीचे नाते असल्यानेच आज आपण हिंदुत्वासाठी एकत्रित आलो आहोत. हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे आपले लक्ष्य आहे. ज्यांना असहाय्य म्हणून आपण देशात आसरा दिला, तेच धर्मांध आज या देशाच्या विनाशाचे कारण ठरत आहेत. प्रखर धर्माभिमानी हिंदूंंनी शौर्य दाखवून या देशद्रोही आणि धर्मद्रोही यांना वैध मार्गाने धडा शिकवला पाहिजे. भगवा शौर्य यात्रेत सहभागी वानरसेना कलियुगातील रावणसेनेवर निश्चित मात करील, असे उद्गार पू. साध्वी सरस्वतीजी यांनी येथे काढले.

येथील नेवरी मंदिरापासून चालू झालेल्या ४ दिवसीय भगवा शौर्य यात्रेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. धर्मरक्षक या हिंदु युवकांच्या संघटनेने या शौर्य यात्रेचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपिठावर श्री जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी, भोपाळचे महापौर श्री. अलोक शर्मा, सहकारमंत्री श्री. विश्वास सारंग, आमदार श्री. विष्णु खत्री आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

प्रारंभी यात्रेचे संयोजक श्री. अभय पंडित यांनी सभेचा उद्देश विषद केला. या वेळी श्री जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी यांनी शौर्यासह धैर्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद यादव म्हणाले, ही यात्रा आपल्याला ईश्वरी अधिष्ठान ठेवून आणि शिस्तबद्धरित्या करायची आहे. १४० किमी यात्रेच्या मार्गातील ८० गावांतील हिंदु युवकांना जागृत करण्यासाठी ही यात्रा आहे. या गावांतून मंदिर स्वच्छतेसह जातपात विसरून एक हिंदु म्हणून सर्वांना संघटित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शौर्याचा वारसा जपायला हवा ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

सनातन संस्थेला हिंदु धर्माचा प्रसार करतांना पोलिसी छळाला सामोरे जावे लागले. केवळ ईश्वरी कृपेने या अग्नीदिव्यातून सनातनचे रक्षण झाले. येत्या काळात इसिससारख्या संघटना भारतात जिहादद्वारे इस्लामी राष्ट्र स्थापनेच्या सिद्धतेत आहेत. या आतंकवादापासून देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला देवता आणि क्रांतीकारक यांनी दिलेला शौर्याचा वारसा पुढे चालवायला हवा. याद्वारेच वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे.

 

क्षणचित्रे

१. पू. साध्वीजींच्या शोभायात्रेत एक मुसलमान महिला त्यांना हात जोडून नमस्कार करत असतांना तिच्या नव-याने तिला घरात धक्का मारून ढकलले. (मुसलमानांची धर्मांधता ! – संपादक)

२. भोपाळ शहरातील सहस्रो युवक या शौर्य यात्रेत सहभागी झाले होते. पू. साध्वी सरस्वती आणि अन्य मान्यवर यांनी या यात्रेत काही किलोमीटर सहभागी होेऊन युवकांचा उत्साह वाढवला. शहरातील चौकाचौकांत यात्रेचे भव्य स्वागत आणि भव्य पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

३. सर्व युवकांनी धर्मरक्षक असे लिहिलेले भगवे टी शर्ट घातले होते.

४. उद्घाटन स्थळी हिंदु जनजागृती समितीची हिंदु राष्ट्र आणि क्रांतीकारक यांविषयाच्या संदर्भातील फ्लेक्स आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.

५. पू. साध्वी सरस्वतीजी यांनी त्यांच्या भाषणातून हिंदु राष्ट्र का हवे ? आणि लव्ह जिहाद या ग्रंथांची माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात