नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हनुमान जयंती उत्सवात सनातन संस्थेकडून धर्मप्रसार

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त भाऊराव देवरस विद्यालयामध्ये सुंदरकांडाच्या पठणाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी सनातन संस्थेकडून ‘हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानतत्त्वाचा अधिकाधिक कशा प्रकारे लाभ घेऊ शकतो’, याची माहिती देण्यात आली. तसेच येथे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याचा २०० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. अलीगड येथील भाजपचे खासदार श्री. सतीश गौतम आणि केंद्रीयमंत्री श्री. महेश शर्मा यांचे बंधू श्री. नरेश शर्मा यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. श्री. शर्मा म्हणाले, ‘‘तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात