ईश्वरपूर येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास आमदार जयंत पाटील यांची सदिच्छा भेट !

ईश्वरपूर येथे ग्रंथ प्रदर्शनास भेट देतांना आमदार श्री. जयंत पाटील
तुंग येथे श्रीराम मंदिराच्या संदर्भातील निवेदनावर स्वाक्षरी करतांना भाविक

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – येथील महावीर चौकात लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री श्री. जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. पाटील यांनी सात्त्विक उत्पादने खरेदी केली. श्री. पाटील यांनी ‘तुमचे कार्य चांगले आहे’, असे सांगितले. या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री. खंडेराव जाधव आणि शहाजी पाटील उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक श्री. विजय कुंभार यांनीही सदिच्छा भेट दिली.

तुंग येथील प्रदर्शनास श्री शिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. सचिन पवार यांनी सदिच्छा भेट दिली. सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्ताने लावलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘हिंदूंना श्रीरामजन्मभूमीवर पूजा करण्यास विशेष अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच या प्रकरणी संसदेत श्रीराम मंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्याच्या आधारे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास प्रारंभ करावा’, या मागण्यांसाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. त्यालाही भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात