आर्थिक क्षमता नसतांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करणे आणि त्यानंतर द्राक्षाचे अधिक पीक आल्याने सर्व कर्ज फिटणे अन् त्यामुळे अर्पणाचे महत्त्व समजणे

आर्थिक क्षमता नसतांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त
१०१ रूपये अर्पण करणे आणि त्यानंतर अर्धा एकर भूमीत द्राक्षाचे
अधिक पीक आल्याने सर्व कर्ज फिटणे अन् त्यामुळे अर्पणाचे महत्त्व समजणे

        १५ वर्षांपूर्वी माझे मित्र श्री. राजाराम बंडू ईर (पाटील) (रहाणार बोरगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, वय वर्ष सध्याचे ७९, हे आमची शेती करत होते.) हे प्रतिवर्षाप्रमाणे जून मासात मिरज आश्रमात आले होते. मी त्यांना रोख पैसे देऊन शेतीसाठी खते आणि बियाणे घेण्यास सांगितले. मित्राची आर्थिक कुवत नाही, हे ठाऊक असूनही मी त्यांना गुरुपौर्णिमेसाठी १०१ रुपये अर्पण करायला सांगितले. त्यांनी मला सांगितले, आता तुम्ही माझ्या वतीने पैसे भरा. मी तुम्हाला धान्य विकून झाल्यावर पैसे देईन. त्याप्रमाणे मी त्यांच्या नावाने १०१ रुपये अर्पण केले.

        मित्र गुरुपौर्णिमेसाठी मिरज येथे आले असतांना त्यांनी मला १०१ रुपये दिले. मित्राने फेब्रुवारी मासात अर्धा एकर भूमीत द्राक्षे लावली होती. त्याचे त्यांना १ लक्ष रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळाले. मित्राला याचे पुष्कळ आश्‍चर्य वाटले. त्यांच्या शेजारच्या १ एकर शेतात लावलेल्या पिकाचे दुसर्‍या शेतकर्‍याला अल्प पैसे मिळाले. मित्राने आश्रमातील साधकांसाठी ७ – ८ किलो द्राक्षे दिली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, देवाने तुम्हाला १ सहस्रपटीने द्राक्षे दिली. त्या वर्षी त्यांच्यावर असलेले सगळे कर्ज फिटले. तेव्हा त्यांना गुरुपौर्णिमेसाठी नियमित अर्पण करण्याचे महत्त्व समजले.

– (पू.) श्री. सुदामराव शेंडे, देवद आश्रम, पनवेल. (२५.६.२०१६)

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात