स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती सोहळ्यात सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कीर्तनातून शिवचरित्र मांडण्याची आवश्यकता ! – ह.भ.प. अनिल महाराज बडवे

ह.भ.प. अनिल महाराज बडवे

श्रीक्षेत्र आळंदी – कीर्तनकार प्रभावी वक्तृत्वाने समाजाला भक्तीमार्ग विशद करून सांगतात. कीर्तनकारांनी कीर्तन आणि प्रवचन करतांना शिवचरित्रातील प्रसंगही सांगायला हवेत. समाजामध्ये हिंदवी स्वराज्याचा इतिहास पोहोचायला हवा. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या कार्यात जनसामान्यांचा सहभाग वाढेल, असे प्रतिपादन ह.भ.प. अनिल महाराज बडवे यांनी केले.

२२ मार्चला सायंकाळच्या उद्बोधन सत्रात ‘ज्ञानेश्वरी’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘संतांनी त्यांच्या अनेक अभंगांतून नामस्मरणाचे महत्व सांगितले आहे. भक्त प्रल्हादाच्या प्रसंगातून नामस्मरणाच्या शक्तीचा अनुभव होतो; म्हणूनच सर्वांनी नामस्मरण करायला हवे.’’

२३ मार्चला सकाळी ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. संतांच्या महिम्याविषयी ते म्हणाले, ‘‘कीर्तन हे केवळ आपल्यातील कृतज्ञता भाव प्रकट करण्याचे माध्यम आहे. संतांचा महिमा सर्वांना कळेलच असे नाही. भिंत चालत नाही; पण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात आले, तर भिंतही चालली. रेड्याच्या मुखी वेद वदवणे माऊलींच्या इच्छेनेच झाले.’’

ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक

दुपारी ३ ते ४.३० या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांनी अत्यंत भावस्पर्शीपणे रामजन्माची कथा सांगितली. या वेळी अनेक भाविक आनंदाने नृत्य करत होते. कीर्तनाच्या वेळी श्रावणबाळाचा प्रसंग ऐकतांना अनेक भाविकांना भावाश्रू आले. या वेळी प.पू. १००८ महामंडलेश्ववर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांसह अनेक मान्यवर आणि संत उपस्थित होते.

 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कार्यक्रमस्थळी क्रांतिकारकांची शौर्यगाथा सांगणारे, तसेच सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये तरुण वारकऱ्यांचा मोठा सहभाग होता. महिला वारकरीही स्वतःहून अभिप्राय लिहून देत होत्या. अनेक वारकरी कक्षावरील दैनिक ‘सनातन प्रभात’ उत्सुकतेने वाचत होते

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वामी वासुदेवानंद यांच्याशी बोलतांना समितीचे श्री. सुनील घनवट
श्री अर्जुन महाराज खोत यांना दैनिक सनातन प्रभात देतांना श्री. सुनील घनवट.

 

 

 

 

 

 

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात