हिंदूंवर कितीही अन्याय केला, तरी हिंदु राष्ट्र येणारच ! – श्री. अभय वर्तक

१४ जून या दिवशीच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या
सकाळच्या सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. सध्याच्या शासनाच्या स्वत:च्या संकुचित दृष्टिकोनामुळे राममंदिराची स्थापना, गोहत्याबंदी होऊ शकले नाही. भ्रष्टाचार, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, हिंदुत्वनिष्ठांचा छळ चालूच आहे. हिंदूंवर अन्याय केला, म्हणून हिंदूंचा आवाज दबणार नाही कि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य थांबणार नाही. काहीही झाले, तरी हिंदु राष्ट्र येणारच, हे निश्‍चित ! हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवतांना कितीही आम्हाला विरोध झाला, तरी आम्ही मागे हटणार नाही. सध्याची भ्रष्ट आणि अनैतिक समाजव्यवस्था हटवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्य करणार आहेत. पनून काश्मीर ही लक्षावधी काश्मिरी हिंदूंची मागणी असून ते घेतल्याविना आम्ही हिंदू स्वस्थ बसणार नाही. ही देवता आणि संत यांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या घोषणा देत वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना नक्की करू.