कोरींज (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या वतीने गुढीपाडव्याचे महत्त्व स्पष्ट करणारे कार्यक्रम

 

कोरींज (कर्नाटक) – बेळतंगडी जिल्ह्यातील कोरींज येथील पंचलिंगेश्‍वर देवस्थानाच्या समुदाय भवनातील एका कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त म्हणजे हिंदूंच्या नववर्षारंभानिमित्त माहिती, तसेच या दिवशी घरासमोर ‘ब्रह्मध्वज’ कसा उभा करायचा, त्याचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. या संदर्भात सनातन संस्थेचे श्री. रमेश यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या श्री. जनार्दन गौड यांनी ‘ब्रह्मध्वज’ उभा करायचे प्रात्यक्षिक करून दाखवून त्याच्या महत्त्वाविषयी सविस्तर माहिती सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात