सनातन संस्थेचा देहली आणि फरीदाबाद येथील प्रसारकार्याचा आढावा

१. प्रवचन

‘फरीदाबाद मधील सैनिक कॉलनी येथे ‘मकरसंक्रांतीचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन करण्यात आले.

 

२. ग्रंथ/फ्लेक्स प्रदर्शन

अ. देहली येथे जानेवारी मासात ८ दिवसीय जागतिक पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनुमाने २ लक्ष जिज्ञासूंनी घेतला.

आ. फरीदाबाद येथे सेक्टर ३१ मधील श्री हनुमान मंदिर आणि वाय.एम्.सी.ए. महाविद्यालय येथे स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.’

– कु. मनीषा माहुर, देहली आणि सौ. तृप्ती जोशी, फरीदाबाद (फेब्रुवारी २०१७)