विस्थापित काश्मिरी हिंदूंची विदारक सत्यस्थिती !

२४ मार्च या दिवशी असलेल्या ‘मानवाधिकारांचे हनन आणि पीडितांची प्रतिष्ठा यासंबंधीचे सत्य जगासमोर मांडण्याचा अधिकार’ या संदर्भातील आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने…

जिहाद्यांकडून ठार करण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंचे मृतदेह

जिहादी आतंकवादाच्या वाढत्या कारवायांमुळे १९९० च्या दशकामध्ये लाखो काश्मिरी हिंदूंना स्वत:चे घर-दार, व्यवसाय, फळांच्या बागा इत्यादी सर्वांवर तुळशीपत्र सोडून काश्मीरमधून पलायन करावे लागले. त्या कालावधीत सहस्रो काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली. शेकडो मंदिरे भुईसपाट करण्यात आली. शेकडो गावांना इस्लामी नावे दिली गेली. परिणामी स्वधर्म आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लाखो हिंदूंना देशाच्या इतर भागांत विस्थापित व्हावे लागले. आजमितीस २७ वर्षे झाली, तरी काश्मिरी हिंदू स्वत:च्याच देशात विस्थापितांचे जीवन जगत आहेत.

एवढे कमी की काय, भारतातील बहुतांश राजकीय पक्ष आणि ‘इलीट क्लास’ (उच्चभ्रू बुद्धीवादी वर्ग), आणि मेनस्ट्रीम मीडिया (मोठी प्रसारमाध्यमे) काश्मिरी हिंदूंवर झालेल्या या अनन्वित, अमानवीय अत्याचारांना नि वंशविच्छेदाला स्वीकारायला सिद्ध नाहीत. या अनुषंगाने ‘मानवाधिकारांचे हनन आणि पीडितांची प्रतिष्ठा या संबंधीचे सत्य जगासमोर मांडण्याचा अधिकार’ या संदर्भातील आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने काश्मिरी हिंदूंचे भयावह वास्तव आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. यांतून वाचकांना बुद्धीवादी, प्रसारमाध्यमे इत्यादींचा हिंदुद्वेष लक्षात आल्याविना रहाणार नाही.

१. असाहाय्य जीवन कंठणारे काश्मीरमधील हिंदू !

आक्रोश करतांना काश्मिरी हिंदु स्त्रिया

अ. काश्मीर खोर्‍यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंची विदारक स्थिती !

‘२८ ऑक्टोबर २०१० या दिवशी जम्मूच्या बहुचर्चित नागरोटा आणि मुठ्ठी या स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या तळामध्ये तरुणांना भेटण्यासाठी मी गेलो. काश्मीर खोर्‍यातील डॉ. अमित वांछू आणि जम्मूतील संजय धर यांच्यासोबत मी जेव्हा तरुणांशी बोलू लागलो, तेव्हा पहिलाच विशीतला तरुण आला आणि सांगू लागला, ‘‘आम्ही अनेक वर्षे हलाखीत जगत आहोत. आम्ही ८ बाय ८ च्या खोलीत रहातो. पूर्वी शासन प्रत्येक कुटुंबाला ४ सहस्र रुपये महिना भत्ता द्यायचे. आता ती रक्कम ५ सहस्र झाली; पण एकाच कुटुंबात ४ व्यक्ती असो कि १०, भत्ता तेवढाच मिळतो. वाढत्या महागाईत कसे भागणार ? येथे उत्तम शाळा नाही. आमची काळजी करणारे कोणीच नाही, तर दुसरीकडे काश्मीर खोर्‍यात सगळे नेते जातात. सहस्रावधी कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ देतात. मुसलमानांना गोंजारले जाते आणि देेशावर प्रेम करणार्‍या काश्मिरी पंडितांना मात्र स्वत:ची मातृभूमी सोडून येथे जम्मूत येऊन रहावे लागते.’’ हा तरुण अत्यंत त्वेषाने आपली मते मांडत होता आणि स्थलांतरितांच्या तळामधील स्थिती मला दाखवत होता.’ – संजय नहार, अध्यक्ष, सरहद (सामाजिक संस्था), पुणे

आ. काश्मीर खोर्‍यातील हिंदूंची दयनीय अवस्था !

‘काश्मीर खोर्‍यात हिंदु महिलांना बिंदी लावून बाजारात जाणे कठीण झाले आहे. हिंदु पुरुष आणि महिला स्वतःची हिंदु ओळख लपवणेच अधिक संयुक्तिक आणि सुरक्षित समजत आहेत. श्रीनगरमध्ये पूर्वी २ सहस्र ५०० हून अधिक हिंदु कुटुंब रहात होती. आता केवळ २० हिंदु कुटुंब शिल्लक राहिली आहेत.’ – तरुण विजय, भाजप.

इ. पोलिसांकडून साहाय्य मिळण्याऐवजी फुटीरतावादी गिलानी यांना शरण जाण्याचा सल्ला !

‘काश्मीर खोर्‍यात उरलेल्या २० हिंदु कुटुंबियांनाही तेथून जाण्याची धमकी गेल्या वर्षी देण्यात आली होती. यानंतर स्थानिक कश्मिरी हिंदु नेत्यांनी पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली असता पोलीस साहाय्य करण्यापासून मागे हटले. शेवटी एका वरिष्ठ अधिकार्‍याने या नेत्यांना सांगितले की, तुम्ही तुमची सुरक्षितता ठेवू इच्छित असल्यास सय्यद अली शहा गिलानी यांना जाऊन भेटा. निरुपायाने ते हिंदूू गिलानी यांच्याकडे गेले आणि त्यांना सुरक्षितता मिळाली. या प्रकारे विघटनवादी त्यांच्या मागण्या शीख आणि हिंदु कुटुंबांकडून मान्य करवून घेण्यात यशस्वी होतात.’ – तरुण विजय, खासदार भाजप.

२. काश्मिरी पंडितांच्या धगधगत्या मनाचे मनोगत !

१. राज्यकर्त्यांना आपण प्रजेचे पालक समजतो; पण हे तर खविस आहेत.

२. काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आमचे जीवन उद्ध्वस्त करून आमचा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला.

३. काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना शत्रूशी दोन हात करायची इच्छा नाही; म्हणून आम्ही आमच्या राज्यात, गावात परत जायचे नाही का ?

४. आम्हाला आणखी किती वर्षे असे निर्वासितांचे जिणे कंठावे लागणार आहे ?

५. काँग्रेसचे राज्यकर्ते हे क्रूर मुसलमानांचे वंशजच म्हणावे लागतील.

६. हे काँग्रेसचे राज्यकर्ते आणखी किती वर्षे मुसलमानांच्या आणि पाकिस्तानच्या ताटाखालचे मांजर बनून रहाणार आहेत ?

७. आता आमची सहनशक्ती संपत चालली आहे. एकदा का तिने मर्यादा पार केली, तर काय घडेल हे आम्ही आता सांगू शकत नाही.

८. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. तसे काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना या महापापाचे फळ थोड्याच काळात भोगावे लागेल. ते फळ फारच वाईट असेल. काळाचा फास त्यांच्या गळ्याभोवती असा पडेल की, त्यांना या त्रिभुवनात कुठेही लपायला जागाच उरणार नाही.

९. काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनो, देशावर राज्य करणे हा एक खेळ समजू नका ! तुमच्या चुकलेल्या प्रत्येक निर्णयामुळे जनतेच्या झालेल्या हानीस तुम्हीच सर्वस्वी जबाबदारआहात ! सत्तेच्या गुर्मीत, मस्तीत राहून कसेही वागाल, तर तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला भयानक नरकाच्या दिशेने नेर्ईल, याची जाणीव ठेवा ! काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना पुन्हा मनुष्यजन्म तर नसेलच, शिवाय त्यांच्या शेकडो पिढ्या नरकात खितपत पडतील.

(साभार : ‘मनोगत’, भारतीय जनता पक्षाचे नियतकालिक, मुंबई.)

३. एका विस्थापित काश्मिरी हिंदूचे मनोगत !

‘मी विस्थापित आहे’, ही काल्पनिक गोष्ट नसून मी माझ्या समाजाचा एक त्रास भोगलेला (पीडित) अनुभवी घटक आहे !

‘मी विस्थापित आहे’, ही काही काल्पनिक गोष्ट नाही. मी माझ्या समाजाचा एक त्रास भोगलेला (पीडित) अनुभवी घटक आहे. माझे मूळ पवित्र सतीसरच्या पायथ्याशी आहे. माझे अस्तित्व त्रिवेणी संगमातच आहे. भारतीय संस्कृती, बौद्ध विहार आणि मार्तण्डचे भग्नावशेष हे सर्व माझ्या मनःपटलावर सुवर्ण अक्षरांत कोरले गेले आहेत. ‘राजतरंगिणी’ आणि ‘वाख’ हे ग्रंथ माझ्या पूर्वजांची देणगी आहे. शंकराचार्यांचा हरि पर्वतावरील शंखनिनाद, क्षीरभवानी येथील अष्टमीचा दिवस, पवित्र अमरनाथ गुहेकडे यात्रेसाठी हिमशिखराच्या दिशेने पायवाटेने गटागटाने चालत असलेले सहस्रो दर्शनेच्छुक भाविक, अलौकिक छटांनी नटलेला शेषनाग आणि येथील जलप्रवाह यांपैकी कोणत्याही गोष्टींचा मला विसर पडलेला नाही. मी अनेक वेळा निर्वासित झालो आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. माझा समाज आता ११ घरांपुरताच (शिबिरांपुरताच) मर्यादित झाला होता. राष्ट्रभक्तीचे फळ मी आजतागायत भोगतो आहे आणि त्याच कारणामुळे ‘आज मी निर्वासित आहे.’ (संदर्भ : संकेतस्थळ)

बांगलादेशातील हिंदूंसाठी जगात कुणीच वाली नाही का ?

बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता !

‘ढाका येथील ‘व्हॉईस ऑफ जस्टीस’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या  वृत्तानुसार, बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही. वर्ष १९७१ च्या बांगलादेश  मुक्ती लढ्याच्या वेळी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला. त्या वेळी बांगलादेशमध्ये  लाखो हिंदूंची हत्या करण्यात आली, तर अनेकांनी बांगलादेशमधून पलायन केले. आजही  बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ चालूच आहे. सदर  वृत्तात पुढे म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये धर्मस्वातंत्र्य नाही. बांगलादेशी हिंदू प्रतिदिन त्यांच्या देशातून भारतात पलायन करत आहेत. शेजारचा हिंदुबहुल भारत बांगलादेशी हिंदूंच्या व्यथेविषयी एक शब्दही बोलत नाही.’ (आपल्या धर्मबांधवांच्या यातनांकडे दुर्लक्ष करणार्‍या भारतीय हिंदूंना आणि बहुसंख्यांक हिंदूंच्या मतांवर निवडून येणार्‍या सत्ताधार्‍यांना हे लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात