हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

यवतमाळ – उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य करून श्रीराम आणि सीता यांचा अवमान केला आहे. तसेच साजीद रशीद यांनीही पंतप्रधानांचा अवमान केला. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याने संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.

वैदिक ब्राह्मण संघटना, पतंजली योगपीठ, हिंदुराज मंडळ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या

१. केंद्रशासनाने धर्मांतर बंदी कायदा तात्काळ लागू करावा.

२. कर्नाटक शासनाने पी.एच्.डी, एम्.फिल् करणार्‍या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय रहित करावा.

३. श्री सिद्धीविनायकाच्या मंदिरात श्रीफळ घेऊन जाण्यासाठी बंदी घालण्यात येऊ नये.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात