सनातन संस्थेचे केरळ राज्यातील प्रसारकार्य

 

१. वसंतपंचमीच्या निमित्ताने दुकानदारांना सरस्वतीदेवीचे महत्त्व सांगून ग्रंथांचे वितरण

‘वसंतपंचमीच्या निमित्ताने केरळ येथील साधिका सौ. सुमा पुतलथ यांनी सरस्वतीदेवीचे महत्त्व आणि त्या दिवशीच्या निमित्ताने ज्ञानदानाचे महत्त्व लोकांना सांगून मल्याळम् भाषेतील लघुग्रंथ दुकानदारांना दाखवले. हे ग्रंथ त्यांनी विकत घेतले आणि ते त्यांच्या दुकानात येणार्‍या ग्राहकांमध्ये वितरित करणार आहेत.

 

२. थिरुवनंतपुरम् जिल्ह्यात ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्व्हिस फेअर’मध्ये ग्रंथप्रदर्शन

२ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत केरळ येथील थिरुवनंतपुरम् जिल्ह्यात ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्व्हिस फेअर’ नावाचा पुस्तक मेळा होता. त्यात ग्रंथ अन् फ्लेक्स यांचे प्रदर्शन लावण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

 

३. ‘शिवरात्र’ या विषयावर मार्गदर्शन

कोचीनमध्ये एका जातीय संघटनेच्या एका युनिटमध्ये त्यांच्या मासिक बैैठकीत सौ. शालिनी सुरेश यांना ‘शिवरात्र’ या विषयावर बोलायची संधी मिळाली. शिवरात्रीच्या व्रताबद्दल त्यांनी माहिती सांगितली.’

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात