धर्माच्या संस्कारांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही ! – श्री. सुशील चौधरी

गोविंदपूर (झारखंड) येथील हिंदु धर्मजागृती सभा

डावीकडून श्री. सुशील चौधरी, श्री. चित्तरंजन सुराल, श्री. प्रदीप खेमका आणि सूत्रसंचालन करतांना कु. निशाली सिंह

धनबाद (झारखंड) : संपूर्ण गोहत्याबंदी, कलम ३७०, समान नागरी कायदा आदी विषयांवर आज कोणीही बोलत नाही. अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचा विषय केवळ भाषाणांपुरताच मर्यादित राहिला आहे. स्वार्थामध्ये मग्न असणारे राजकारणी कधीही राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणाचे कार्य करू शकत नाहीत, असे प्रतिपादन पूर्व अन् ईशान्य भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी केले. येथील गोविंदपूरच्या दुर्गा मंदिर परिसरातही हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धनबादमधील गोरक्षण प्रमुख श्री. सुशील चौधरी आणि सनातन संस्थेचे झारखंड समन्वयक श्री. प्रदीप खेमका यांनीही उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन कु. निशाली यांनी केले. या सभेला ३८० धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.

धर्माच्या संस्कारांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही ! – श्री. सुशील चौधरी

ज्या प्रांतातून हिंदू अल्पसंख्य होतात, तो प्रांत देशापासून दूर जातो. भारतामुळेच विश्‍वाचे कल्याण होणार असल्याने हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले सनातनचे साधक आणि हिंदु समाज यांच्याकडून जे प्रयत्न करून घेत आहेत, ते श्रेष्ठ प्रयत्न आहेत.

श्री. प्रदीप खेमका यांनी दिवसांतून किमान ५ वेळा ‘हे भगवान श्रीकृष्णा, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करा’, अशी प्रार्थना करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात