खारपाडा (पेण) येथे धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनाचे शिवसेनेचे राजाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पेण (जिल्हा रायगड) : येथील खारपाडा गावात धर्मरथात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. शिवसेनेचे श्री. राजाराम पाटील यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्री. राजाराम पाटील म्हणाले, ‘‘सनातन संस्था हिंदु धर्माच्या प्रसाराचे कार्य करते, हे स्तुत्य आहे. संस्थेचे कार्य असेच पुढे वाढत जावो, ही सदिच्छा !’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात