सनातन संस्थेच्या वतीने ‘गर्भसंस्कार आणि धर्माचरण यांचे महत्त्व’ या विषयावर संभाजीनगर येथे मार्गदर्शन

मार्गदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू महिला

संभाजीनगर : येथे सनातन संस्थेच्या वतीने सौ. आशा वट्टमवार यांच्याकडे डोहाळे जेवणाच्या निमित्त ‘गर्भसंस्कार आणि धर्माचरण यांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सौ. रोहिणी जोशी यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी सनातन संस्थेचे उपक्रम आणि हिंदु जनजागृती समितीचे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग यांतही सहभागी होण्याचे आवाहन दिले. या कार्यक्रमाला ९० जिज्ञासू महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनीही अशा कार्यक्रमाची मागणी केली. सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचाही उपस्थितांनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात