सनातन संस्था मूलभूत धर्माचे तत्त्वज्ञान सांगून धर्माचा प्रसार करत आहे ! – भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते

पंढरपूर : येथे ८ मार्च या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथील वारकरी संप्रदायचे वक्ते भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला प्रसाद देण्यात आला. या वेळी महाराज म्हणाले, ‘‘सनातन संस्था मूलभूत धर्माचे तत्त्वज्ञान सांगून धर्माचा प्रसार करत आहे. धर्माचे कार्य करतांना सर्वांना त्रास होतो. प्रभु रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, आद्य शंकराचार्य यांनाही त्रास झाला आहे. शंकराचार्य यांनी त्या त्या वेळच्या हिंदु धर्मावर आघात करणारे अन्य संप्रदायाच्या प्रमुखांना वादविवाद करून हरवले आणि हिंदु धर्माची धुरा पुन्हा स्थापन केली. आपण आपले कार्य करत रहाणे महत्त्वाचे आहे.’’ त्या वेळी सनातन संस्थेच्या कु. दीपाली मतकर, सौ. उल्का जठार, श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, श्री. आदित्य शास्त्री आणि श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात