सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नातेवाइकांची चौकशी

रामनाथी (गोवा) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गोव्यात रहाणार्‍या नातेवाइकांची पोलिसांकडून २ मार्च या दिवशी चौकशी करण्यात आली. कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाकडून (एस्आयटीकडून) ही चौकशी करण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या या नातेवाइकांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग नसतांनाही त्यांची चौकशी करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात