मराठीचा न्यूनगंड बाजूला सारून मराठी भाषेतच व्यवहार करा ! – अधिवक्ता श्री. विवेक भावे

कल्याण : आधुनिक वैद्य, अभियंते, वैज्ञानिक यांनीही मातृभाषेत शिक्षण घेऊनच यशाची शिखरे पादाक्रांत केली; म्हणून मराठीचा न्यूनगंड बाजूला सारून मराठी भाषेतच आपले शिक्षण आणि व्यवहार करावेत, असे आवाहन अधिवक्ता श्री. विवेक भावे यांनी येथे मराठी भाषादिनानिमित्त कल्याण बसआगरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

या वेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. राजाराम पाटील म्हणाले, ७०० वर्षांपूर्वीचे पसायदान आजही सर्वश्रेष्ठ आहे. भगवद्गीता हा सर्वांत महान ग्रंथ आज आपल्याकडे मराठी भाषेत संतांमुळे उपलब्ध आहे. मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी पुस्तके, साहित्य, संत वाङ्मय वाचायला हवे आणि ते आचरणातही आणायला हवे. भाषाशुद्धी ही काळाची आवश्यकता आहे.

या वेळी सनातनने प्रकाशित केलेले भाषाशुद्धी आणि मराठी भाषा यांच्या संदर्भातील ग्रंथ कर्मचार्‍यांना भेट देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात