पुणे आणि चिंचवड येथील ग्रंथप्रदर्शनाला नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट

भाजप नगरसेवक श्री. मुरलीधर मोहोळ (उजवीकडे)
शिवसेनेचे नगरसेवक श्री. पृथ्वीराज सुतार (उजवीकडे)

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त येथील वनाझ (कोथरूड) आणि चिंचवडमधील श्रद्धा गार्डन येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी असलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भेट दिली.

१. वनाझ परिवार शिवमंदिर येथे भाजप नगरसेवक श्री. मुरलीधर मोहोळ, भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे आणि शिवसेनेचे नगरसेवक श्री. पृथ्वीराज सुतार यांनी कक्षाला भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. विश्‍वास नाईक यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.

२. श्रद्धागार्डन केंद्रातील शाहूनगर येथील ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे तुषार हिंगे आणि अनुराधा गोरखे यांनी भेट दिली. या वेळी तुषार हिंगे यांनी सांगितले की, तुम्हाला काही साहाय्य लागल्यास कधीही सांगा, मी करीन. या वेळी त्यांनी २ ग्रंथ खरेदी केले.

वैशिष्ट्यपूर्ण

चंदननगरमधील श्री सोमेश्‍वर मंदिर येथे कु. रणजीत भगवान बयस (वय ८ वर्षे) याने ग्रंथप्रदर्शन पाहिल्यावर आईकडे ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ विकत घेण्याची मागणी केली. या वेळी आईकडे पैसे नसल्याने त्यांनी त्यांच्यासह आलेल्या अन्य महिलांकडून पैसे घेऊन ग्रंथ विकत घेतला. (अशी तळमळ किती हिंदूंमध्ये आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात