वेदशास्त्र विद्यालयाचे सदाशिव (शास्त्री) पारखी गुरुजी यांची सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास सदिच्छा भेट !

मध्यभागी सदाशिव (शास्त्री) पारखी गुरुजी

सागरेश्वर (जिल्हा सांगली) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने श्रीक्षेत्र सागरेश्वर(ता. पलूस) येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला कडेगाव तालुक्यातील शिरगाव येथील वेदशास्त्र विद्यालय, प्राचीन विद्याधामचे सदाशिव (शास्त्री) पारखी गुरुजी आणि त्यांचे शिष्यगण यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. सयाजीराव जमदाडे यांनी त्यांना दैनिक सनातन प्रभातचा शिवमहिमा विशेषांक भेट दिला. पारखी (शास्त्री) गुरुजी यांनी सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिला. पारखी गुरुजी वेदशास्त्री विद्यालय चालवतात. या विद्यालयातून आतापर्यंत ३०० विद्यार्थ्यांनी पौराहित्याचे शिक्षण घेतले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात